‘जीएसएल’ तर्फे गोव्याला ऑक्सिजन प्रकल्प 

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

राज्यातील कोरोना महामारीने थैमान घातल्याने उत्तर गोवा खासदार व केंद्रीय राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारच्या सहकार्याने गोवा शिपयार्डने गोव्याला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

पणजी: राज्यातील कोरोना महामारीने थैमान घातल्याने उत्तर गोवा खासदार व केंद्रीय राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारच्या सहकार्याने गोवा शिपयार्डने गोव्याला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पाची क्षमता एका मिनिटाला 960 लिटर्स वैद्यकीय ऑक्सिजन एवढी असून तो एका महिन्याच्या कालावधीत उभा करण्यात येणार आहे. (Goa Shipyard Limited will provide oxygen generation project)

यासंदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विरोधातील लढ्यात संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दले युध्यपातळीवर काम करत असून संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) गोवा सरकारचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने कोरोना इस्पितळासाठी लागणारा ‘ऑनसाईट ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट’ उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. गोवा शिपायार्ड लिमिटेडने देऊ केलेल्या या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 1 कोटी रुपये असून गोवा सरकारच्या कोरोना विरोधातील लढ्यात यामुळे निश्चितच बळकटी येईल, असा विश्‍वास त्यांनी  केला. 

ऑक्सिजन पुरविणाऱ्या कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा भाजप सरकारकडून छळ 

या प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती दन क्षमता एका मिनिटाला 960 लिटर्सचे वैद्यकीय ऑक्सिजन असून तो एका महिन्याच्या कालावधीत उभा राहील. पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी आणि आरोग्य सुविधांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास नवनवीन पद्धती वापरण्यावर भर दिला आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने उचललेले महत्वाकांक्षी पाऊल या प्रयत्नाचा एक भाग आहे.

...तोपर्यंत अभ्‍यास सुरू ठेवा

याशिवाय वैद्यकीय ऑक्सिजनची निकड लक्षात घेऊन गोवा शिपयार्ड लिमिटेड अंदाचे 26 लाख रुपये किंमतीचे 40 ‘ऑक्सिजन कॉन्सॅनट्रेटर्स’ गोवा सरकारला उपलब्ध करुन देणार असून  पैकी 4 ऑक्सिजन कॉन्सॅनट्रेटर्स गोव्याच्या वैद्यकीय अधिकाराणीकडे सुपूर्दही करण्यात आले आहेत. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने आपल्या झुआरीनगर येथील युनिट 3 मध्ये 25 खाटा असलेले ‘अलगीकरण’ केंद्र तयार ठेवले असल्याचे नाईक यांनी सांगितले.

गोव्यातील सरकारी कार्यालये 15 मे पर्यंत निर्बंधात 

 

संबंधित बातम्या