Goa: 'शिवोलीच्या विकासाचा पाया कॉंग्रेसच्या काळात घातला गेला'

शिवोलीचे माजी आमदार तथा समाजकल्याण मंत्री असलेल्या चंद्रकांत चोडणकर (Chandrakant Chodankar) यांनी शिवोलीत सांगितले.
Chandrakant Chodankar
Chandrakant ChodankarDainik Gomantak

शिवोलीच्या (Shivolim) विकासाचा पाया हा माझ्या कारकिर्दीत तसेच कॉंग्रेस सरकारच्या काळात रचला गेला इतकेच नव्हे तर शिवोलीत अपक्ष म्हणून निवडून पहिल्यांदा येण्याचा इतिहास माझ्यामुळेच घडला गेला, दुर्दैवाने त्यानंतर शिवोलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना विकास कशासी खातात याच गोष्टीची कल्पनाही नव्हती आणी म्हणूनच आज शिवोलीची वाताहत झालेली आपणांस दिसून येते असे शिवोलीचे माजी आमदार तथा समाजकल्याण मंत्री असलेल्या चंद्रकांत चोडणकर (Chandrakant Chodankar) यांनी शिवोलीत सांगितले.

Chandrakant Chodankar
Goa: कर्नाटकने यंदाही म्हादईचा गळा घोटलाच

भाटी -शिवोली येथील श्रीकालीका ब्राम्हण देवस्थानच्या प्रांगणात शिवोली कॉग्रेसतर्फे आयोजित कडधान्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात चोडणकर (Chodankar) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर, कॉग्रेसचे प्रभारी बाबी बागकर, राज्य युथ कॉग्रेसचे अध्ययक्ष वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar), सरचिटणीस जनार्धन फडटे, शिवोली युथ कॉग्रेसचे अड. रोशन चोडणकर (Roshan Chodankar), संकल्प आमोणकर तसेच देवस्थानचे आध्यक्ष , हनुमंत मांद्रेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Chandrakant Chodankar
Goa : वाडे कुर्डी वसाहतीत पाणीटंचाई

दत्ताराम पेडणेकर यांनी आपल्या भाषणात शिवोलकरांनी मागच्या निवडणुकीत व्यक्ती बदलून पाहिली परिस्थिती मात्र जैसे थेच असल्याचे सांगतानाच आता इतिहासच बदलण्याची वेळ येऊन ठेपल्याचे सांगितले. राज्य प्रभारी बाबी बागकर, वरद म्हार्दोळकर , तसेच रोशन चोडणकर यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. यावेळी दीडशेच्या आसपास स्थानिक महिलांना कडधान्याचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन माजी गटाध्यक्ष राजेश कोचरेकर यांनी केले व त्यांनीच आभार मानले.....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com