गोव्यात यावर्षी प्रथमच मोठ्या संयमाने होतंय ख्रिसमस सेलिब्रेशन

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

कोरोना महामारीमुळे गोव्यात अत्यंत संयमाने नाताळ साजरा करण्यात आला. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थनासभा झाल्या. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांच्या मेजवान्या किनारी भागात रंगल्या होत्या.

पणजी- कोरोना महामारीमुळे गोव्यात अत्यंत संयमाने नाताळ साजरा करण्यात आला. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थनासभा झाल्या. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांच्या मेजवान्या किनारी भागात रंगल्या होत्या.

पणजीच्या इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चच्या बाहेर पर्यटकांची मध्यरात्रीनंतरही मोठी गर्दी होती. चर्चमध्ये पन्नासेक भाविकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा झाली.

दरवर्षी होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा नव्हती. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्याने किनारी भागात वाहतूक कोंडी झाली होती. पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या. सकाळपासून रस्त्यावरील वाहतूक एकदम रोडावली असून वाहनांचे दर्शन अभावानेच होत आहे. खऱ्या अर्थाने सर्वांनीच आज सुट्टी घेतल्याचे दिसून येते.

कोरोना महामारीमुळे यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनाच्या पद्धती बदलल्या असल्या तरी महामारीच्या दु:खाचे सावट स्पष्ट दिसत असून नागरिकांनीही गर्दी न करतच सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.   

संबंधित बातम्या