शिवोलीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा

गट काँग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांचा इशारा
शिवोली मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात माहिती देताना पार्वती नागवेकर. बाजूला दत्ताराम पेडणेकर व हर्षा साळगावकर.
शिवोली मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात माहिती देताना पार्वती नागवेकर. बाजूला दत्ताराम पेडणेकर व हर्षा साळगावकर.Dainik Gomantak

Goa: शिवोली विधानसभा मतदारसंघातील (Siolim Constituency) पाणीपुरवठा (Water supply problems) सुरळीत करावा. हा प्रश्न आठवड्याभरात सोडवला नाही तर स्थानिकांच्या सहकार्याने शिवोली गट काँग्रेस (Congress) आंदोलन (Protest) करील, असा इशारा गटाच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी सरकारला दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा (PWD Mapusa) येथील उपविभाग क्रमांक तीनच्या साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयाला निवेदन सादर केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसच्या शिवोली गट सेवा दलाचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर व महिला गट अध्यक्षा हर्षा साळगावकर उपस्थित होत्या.

शिवोली मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात माहिती देताना पार्वती नागवेकर. बाजूला दत्ताराम पेडणेकर व हर्षा साळगावकर.
डिचोलीत भटक्या कुत्र्यांचा प्रवाशांना त्रास

नागवेकर म्हणाल्या, शापोरा येथील ग्रामस्थांची बैठक होऊन गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी कैफियत ग्रामस्थांनी त्या बैठकीत मांडली. सुमारे सोळा हजार लिटर पाणी लांकांना मोफत उपलब्ध करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात पुरेसा पाणीपुरववठा लोकांना होत नाही.
दत्ताराम पेडणेकर यांनी सांगितले, की कित्येक वेळा आंदोलने करूनही यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने शिवोली मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहाही पंचायत क्षेत्रांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, ही मतदारसंघातील लोकांची मोठी शांकांतिका आहे. काही भागांत सुमारे बारा तास पाणीपुरवठा होतो, तर अन्य भागांत किमान एक तासही पाणीपुरवठा होत नाही, हीच खरी समस्या आहे. त्यामुळे जलकुंभांना बूस्टर बसवण्यात यावेत व ही समस्या दूर करून शापोरा व बादे भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली.

शिवोली मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात माहिती देताना पार्वती नागवेकर. बाजूला दत्ताराम पेडणेकर व हर्षा साळगावकर.
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात 'सार्थक' दाखल

पाणी समस्येमुळे शापोरा येथील रहिवाशांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. पुरेशा साधनसुविधा निर्माण न करता मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले आहे, हे अतिशय हास्यास्पद आहे. गेल्या सुमारे चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार चंद्रकांत चोडणकर यांच्या प्रयत्नांमुळे शिवोली मतदारसंघात जलवाहिनी उभारण्यात आल्यानंतर अद्याप त्या जलवाहिनीची क्षमता वाढवण्यात आली नाही.

-पार्वती नागवेकर, गट कॉंग्रेस अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com