Goa: चार्टर विमान ऑपरेटर्सकडून स्लॉटच्या बुकिंगला सुरुवात

दाबोळी विमानतळावर देशांतर्गत विमान सेवेच्या फेऱ्या वाढल्या असून शनिवार-रविवारी सुमारे 84 विमाने दाखल होतात.
Goa: चार्टर विमान ऑपरेटर्सकडून स्लॉटच्या बुकिंगला सुरुवात
दाबोळी विमानतळDainik Gomantak

दाबोळी: विमानतळावर (airport) चार्टर विमान ऑपरेटर्सकडून स्लॉटच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. चार्टर विमानांमुळे राज्यात विदेशी पर्यटकांची ये-जा सुरू होते. यापूर्वी दोन ऑपरेटर्सनी स्लॉटचे बुकिंग केले होते. आता रोसिया एअरलाइन्स या ऑपरेटरने दाबोळी विमानतळावर स्लॉटचे बुकिंग सुरू केले आहे.याअगोदर स्कॅट एअरलाइन्स आणि किर्गिस्तानच्या एअर असताना या ऑपरेटर्सनी स्लॉट बुक केल्या होत्या.

गोव्यात रशियातून (Russia) सर्वात जास्त विदेशी पर्यटक येतात. चार्टर विमान सुरू झाल्यानंतर ते येण्यास सुरुवात होते. चार्टर विमाने लवकरात लवकर सुरू व्हावीत, अशी टीटीएजीची मागणी आहे. चार्टर विमानांद्वारे डिसेंबरमध्ये विदेशी पर्यटक येण्यास सुरुवात होणार आहे.

 दाबोळी विमानतळ
कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

आठवड्यातून दोनदा रशियातून येणार विमान

किर्गिस्तान येथून पहिले चार्टर विमान डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. रशियातून पहिले चार्टर विमान 30 डिसेंबर रोजी येण्याची शक्यता विमानतळ संचालक गगन मलिक यांनी व्यक्त केली. रोसिया एअरलाइन्सने (Russia Airlines) दाबोळी विमानतळावर 9 स्लॉटची

मागणी केली आहे. मंगळवारी आणि गुरुवारी अशी आठवड्यातून दोन वेळा चार्टर विमाने रशियातून येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

दरम्यान दाबोळी विमानतळावर देशांतर्गत विमान सेवेच्या फेऱ्या वाढल्या असून शनिवार-रविवारी सुमारे 84 विमाने दाखल होतात. सुमारे 20 ते 24 हजार प्रवासी या विमानातून येतात, असे मलिक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com