Goa: दक्षिण - पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू, कोंकण रेल्वे मार्गही खुला

रेल्वे ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर ही वाहतूक सुरू (Goa)
Indian Railway Logo (Goa)
Indian Railway Logo (Goa)Siddhesh Shirsat / Dainik Gomantak

मडगाव: दूधसागर - सोनावळी दरम्यान दरड कोसळून रेल्वेचे इंजिन घसरल्याने काल पासून बंद असलेली दक्षिण - पश्चिम रेल्वे (South-West Railway) मार्गावरील वाहतूक आज दुपार पासून सुरू झाली. त्यापूर्वी सकाळी कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील वाहतूकही सुरू झाली होती.आज दुपारी 2.15 वाजता रेल्वे ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर ही वाहतूक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. असे जरी असले तरी आज वास्कोहुन निझमुद्दीनला जाणारी गोवा एक्सप्रेस (Goa Express) आणि वास्को - यशवंतपूर एक्सप्रेस (Yashwant Express) या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काल या दोन गाड्यासह वास्को - हावडा (Hawda Express)एक्सप्रेस आणि वास्को - तिरूपती एक्सप्रेस (Tirupati Express) अशा 4 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या

Indian Railway Logo (Goa)
Goa: चोर्ला घाटात अखेर बारा तासानंतर वाहतूक सुरळीत

दरम्यान वाशिष्ठी नदीचा पूर ओसारल्याने काल पासून बंद पडलेली कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकही आज पहाटेपासून सुरू झाली. आज दुपारी जनशताब्दी एक्सप्रेस तर सायंकाळी कोंकणकन्या एक्सप्रेस मडगावहुन रवान्या झाल्या. त्यापूर्वी काल रात्री 12.30 वाजता मडगावात अडकून पडलेल्या सुमारे 1000 प्रवाशांना घेऊन एक खास गाडी मुंबईला जाण्यासाठी सोडण्यात आली होती अशी माहिती कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com