गोवा: सुदिन ढवळीकरांच्या अपात्रता याचिकेवर सभापती करणार सुनावणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याआधीच धाव घेतली आहे.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आमदारकीचा राजीनामा न देता दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर या़च्यासमोर ५ एप्रिल रोजी  अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सभापती निवाडा देण्यास वेळ लावत असल्याकारणाने मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याआधीच धाव घेतली आहे. आता त्यांच्या याचिकेवर सहा एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याआधी आता ५ एप्रिलला सुनावणी घेण्याचे सभापतींनी निश्चित केले आहे.

यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सभापती कडून अंतिम सुनावणीसाठी तोडकर यांची अपात्रता याचिका नोंदवली असल्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात ॲटर्नी जनरल तुषार मेहता यांनी सादर केले होते यामुळे ढवळीकर यांची याचिका निकालात न करता सभापतींना सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता मात्र सभापतींनी अंतिम सुनावणी होऊन पंधरा दिवस लोटले तरी अद्याप निवाडा जाहीर केलेला नाही त्यामुळे आता सहा एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणासंबंधी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Goa Speaker to hear Sudin Dhavalikars disqualification petition)

गोवा: ''भाजप सरकारची सामान्यांप्रती असंवेदनशीलता उघड''

पेडण्याचे आमदार मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर  व सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला आहे याप्रकरणी 19 महिन्यांपूर्वीच ढवळीकर यांनी सभापतींना समोर अपात्रता याचिका सादर केली आहे हे याचिकेवर सभापती निवड देण्यास विलंब लावत असल्याकारणाने त्वरित निवाडा देण्यास सभापतींना  निर्देश द्यावेत यासाठी ढवळीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मणिपूर येथील एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सभापतींनी अशा प्रकरणांत नव्वद दिवसात निवाडा द्यावा असे निर्देश दिले आहेत. या निवड्याचा हवाला देत ढवळीकर यांनी ही याचिका सादर केली आहे.

संबंधित बातम्या