गोवा: दहा आमदारांना अपात्र ठरवणारी याचिका सभापतींनी फेटाळली

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी याचिका सभापतींनी आज फेटाळून लावली.

पणजी : कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी याचिका सभापतींनी आज फेटाळून लावली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही याचिका सादर केली होती. (Goa Speakers reject petition disqualifying 10 MLAs)

गोवाः ''टीका उत्सव पासून भाजप घेतोय राजकीय लाभांश''

नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, आंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, क्लाफासिओ डायस, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज आणि चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर या आमदारांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या विषयावर आता २२ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या