गोवा: आमदारांना अपात्र ठरवणारी सुदीन ढवळीकरांची याचिका सभापतींनी फेटाळली

Goa Speakers reject Sudin Dhavalikars petition disqualifying MLAs
Goa Speakers reject Sudin Dhavalikars petition disqualifying MLAs

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये गेलेले मनोहर उर्फ बाबू आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर या दोन्ही आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी याचिका सभापतींनी आज फेटाळून लावली. मगोचे नेते आणि आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी 19 महिन्यांपूर्वी ही याचिका सादर केली होती. (Goa Speakers reject Sudin Dhavalikars petition disqualifying MLAs)

या याचिकेवर सभापती निर्णय घेत नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही आमदारांकडून मगो पक्ष भाजपमध्ये विलीन झाला असा दावा करण्यात आला होता. सभापतींनी केवळ एका ओळीत अपात्रता याचिका आपण फेटाळत आहोत सविस्तर निवाडा नंतर देऊ असे  याचिकादारांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com