डिचोलीत कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Goa: spike of corona patients continues in Dicholi
Goa: spike of corona patients continues in Dicholi

डिचोली: डिचोली तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना महामारीमुळे मागील सलग चार दिवसांपासून डिचोली तालुक्यात मृत्यूसत्र चालूच असून आज तालुक्यात आणखी एक बळी गेला.

उपचारार्थ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलेल्या तालुक्यातील ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्याच्या बुलेटिनवरून ही माहिती मिळाली आहे. मागील सोमवारपासून आजपर्यंत चार दिवसांत चार महिलांसह तालुक्यात सहाजणांचा बळी गेला आहे. मृत्यू सत्रामुळे तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे.

डिचोली तालुक्यात आज गुरुवारी दिवसभरात ४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील डिचोली विभागात १३ रुग्ण, साखळी विभागात ११ रुग्ण, तर मये विभागात २० कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. 

गुरुवारी डिचोली विभागात १९७ मये विभागात १६२ आणि साखळी विभागात १८३ मिळून तालुक्यात एकूण ५४२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.  आज डिचोलीत १८, मयेत १५ आणि साखळीत १२ मिळून तालुक्यात ४५ रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. 

तालुक्यातील ६४ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - १७०, मयेत - १३४ आणि साखळीत - १५७ मिळून ४६१ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील १७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com