Goa: तृणमूल आणि फुटबॉल

बंगाल व गोव्यातील साम्य म्हणजे फुटबॉल
Goa Sports and Politics
Goa Sports and Politics Dainik Gomantak

गोव्यातील फुटबॉल (ISL Football) हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये प्रोफेशनल लीग, नंतर नोव्हेंबरमध्ये आयएसएल (ISL) स्पर्धा सुरू होईल. त्याचवेळेस राज्यातील राजकीय (Goa Politics) वातावरणही तापू लागलेय. लुईझिन फालेरोंचा (Luizinho Faleiro) हात पकडून ‘बंगाली’ तृणमूल काँग्रेस (Trinamool congress) गोव्यात आली आहे.

बंगाल व गोव्यातील साम्य म्हणजे फुटबॉल. दोन्ही राज्यांत हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसने फुटबॉलची मदत घेत ‘खेला होबे’ मोहीम सफल ठरवत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कडवे आव्हान यशस्वीपणे परतवून लावले.

Goa Sports and Politics
फालेरोंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची घेतली भेट

आता बंगालमध्ये सत्तास्थानी असलेल्या पक्षाकडून फुटबॉल खेळत भाजपला गोव्यात मात देण्यासाठी चाचपणी सुरू आहे. येत्या काही महिन्यांत मैदानाबाहेरही गोव्यातील ‘फुटबॉल’ कमालीचा रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

रात्रीस रंगे फुटबॉल!

दरम्यान आगामी आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आठवडाअखेरीस होणाऱ्या दोन लढतींपैकी एक रात्री उशिरा खेळविण्याचे नियोजन आहे. लवकरच वेळापत्रकाची अधिकृत घोषणा होईल, त्यावेळीच ‘लेट नाईट’ सामन्यांच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होईल. एकंदरीत भारतीय फुटबॉलमध्ये आता ‘लेट नाईट’ संस्कृती रूजू पाहतेय. या वर्षी एप्रिलमध्ये गोव्यात एएफसी चँपियन्स लीग सामने झाले होते.

Goa Sports and Politics
एफसी गोवाची अंतिम फेरीत धडक

रमजान ईदमुळे बहुतेक सहभागी देश आखातातील असल्याने रात्रीचे सामने उशिरा झाले होते. आता आयएसएलद्वारे भारतात ‘लेट नाईट’ फुटबॉल पदार्पणास सज्ज होत आहे. युरोपात रात्री उशिरा रंगणारा फुटबॉल खेळ लोकप्रिय आहे. मात्र, कोविडमुळे आयएसएलचा सलग दुसरा हंगाम गोव्यात रिकाम्या स्टेडियमवर खेळला जाईल. बायो-बबल निर्बंधामुळे फुटबॉलप्रेमींना मात्र प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन ‘लेट नाईट’ फुटबॉलच्या आनंदास मुकावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com