Goa: म्हापसा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याने केला 2 अल्पवयीन बहिणींचा विनयभंग

डॉक्टरांनी तपासणी दरम्यान केला महिलेला अयोग्य ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न
Goa: Staff at Mapusa Hospital molested 2 minor sisters and doctor tried to touch private parts during treatment
Goa: Staff at Mapusa Hospital molested 2 minor sisters and doctor tried to touch private parts during treatment Dainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे (Sexual harassment) गुन्हे वाढू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोलवा व फोंडा या परिसरातील लैंगिक अत्याचार तसेच सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यू ही प्रकरणे ताजी असतानाच म्हापसा येथील जिल्हा इस्पितळातील एका कर्मचाऱ्याने दोघा अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याने खळबळ माजली आहे.

संशयिताला अटक होऊनही त्याचे अजूनही निलंबन करण्यात आलेले नाही. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला असुरक्षित होत असल्याचा आरोप विरोधकांकडून व महिला संघटनांकडून होत असताना हा प्रकार घडल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. म्हापसा (Mapusa) जिल्हा इस्पितळातील वॉर्डबॉय गोविंद सावंत (पर्ये - सत्तरी, 47वर्षे) याने 17 व 13 वर्षाच्या मुलींचा इस्पितळच्या लिफ्टमध्ये विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Goa: Staff at Mapusa Hospital molested 2 minor sisters and doctor tried to touch private parts during treatment
Goa: डॉ. शिवानंद बांदेकर यांची मेडीसीन फॅकल्टीचे डीन म्हणून नियुक्ती

डॉक्टरविरुद्धही विनयभंगचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी म्हापसा शहरातील एका दवाखान्याच्या डॉक्टरने विनयभंग केल्याची तक्रार नोंद झाली आहे. डॉक्टरकडून तपासणी होत असताना त्याची वर्तणूक संशयास्पद असल्याचे महिलने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीसाठी बोलावले असता संशयित डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

म्हापसा पोलिसांत दाखल झाल्यानंतर याप्रकरणी गोविंद याला अटक झाली आहे. या मुलींच्या आईला इस्पितळात उपचारासाठी आणण्यात आले होते. इस्पितळात आईला लिफ्टमधून नेत असताना संशयित गोविंद याने याचा फायदा उठवत या मुलींना हात लावून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मोबाईलवरून या मुलींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी भादंसं कलम 354, 354अ, 354 ड व बाल कायदा तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 10 खाली गुन्हा नोंद केला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे अजामिनपात्र आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलींची आई इस्पितळात उपचारासाठी दाखल असल्याने त्या वारंवार येत होत्या. त्यावेळी ज्या वॉर्डमध्ये या मुलींची आई उपचार घेत होती तेथे ते भेट देत होत्या. अनेकदा संशयिताने या मुलींवर पाळत ठेवत होता व तो त्याना इस्पितळच्या लिफ्टमध्ये गाठून विनयभंग करत होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा विनयभंगाचा प्रकार 23 ते 25 सप्टेंबर या दरम्यान घडला.

Goa: Staff at Mapusa Hospital molested 2 minor sisters and doctor tried to touch private parts during treatment
Goa: बागातील दुर्घटनेनंतर न्हावेलीतील घटनेला उजाळा

सखोल चौकशीचे आदेश: आरोग्यमंत्री

म्हापसा उत्तर जिल्हा इस्पितळाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी भेट दिली व इस्पितळातील विनयभंगप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी केली. अधीक्षकांना महिला अत्याचार सतावणूक समितीमार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोक्सो कायद्यानुसार स्त्रीरोग तज्ज्ञांनी चौकशीची नोंद करावी. नवीन कर्मचाऱ्यांना इस्पितळातील नियमाबाबत पूर्वकल्पना देण्यात येईल. मी पीडित मुलींशी चर्चा केली व त्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्याचे धाडस दाखवले. संशयित पोलिस कोठडीत असल्याने माहिती घेता आली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com