Goa: डेंग्यू सदृश्य डास चावला तर जबाबदार कोण...

रवींद्र भवन बायणा येथे उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी ठरू शकते डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत (Goa)
Goa: डेंग्यू सदृश्य डास चावला तर जबाबदार कोण...
रवींद्र भवन बायणा येथे उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी (Goa)Dainik Gomanatak

Goa: रवींद्र भवन बायणा वास्को (Vasco) येथे उड्डाणपुलाखाली उड्डाण पुलाच्या कामामुळे साचलेले पाणी, तसेच ठेवण्यात आलेल्या लाद्या बायणात डेंग्यूचा (Dengue) प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरत असून, याविषयी आरोग्य खाते मात्र सुस्त असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाम कंपनी गॅमन इंडियाच्या निष्काळजीपणावर संबंधितांनी कारवाई करावी, अशी मागणीने जोर धरला आहे.

वास्कोत डेंग्यूने डोके वर काढल्याने येथे भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी योग्य ती उपाययोजना व जागृती करण्यासाठी काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष, नगरसेवक व आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली होती. डेंग्यू रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सदर बैठक झाली असली तरी यावर अजून काही उपाय योजना आखण्यात आरोग्य खाते अपयशी ठरले आहे. वास्को शहरात अनेक बांधकामे चालू असून संबंधित मात्र त्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियासारखे (Malaria) रोग रोखण्यास काय खबरदारी घ्यावी याचे भान ठेवत नसल्याने डेंग्यू सारख्या रोगाने डोके वर काढले आहे.

रवींद्र भवन बायणा येथे उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी (Goa)
Goa: डेंग्‍यूविरोधात मुरगाव तालुक्‍याची वज्रमूठ

दरम्यान मुरगाव तालुक्यात बायणा भागात डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले असून याचे मुख्य कारण म्हणजे येथे चाललेले उड्डाणपुलाचे काम. सदर काम गॅमन इंडिया करत असून त्यांनी जी खबरदारी घ्यावी तशी न घेता आपले काम चालू ठेवले आहे. तसेच मध्यंतरी त्यांच्या कामात खंड पडला होता. त्यामुळे त्यांचे सामान सैरावैरा विखुरलेले आहे. त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. येथील रवींद्र भवन समोर वाहतूक कार्यालयासमोर पावसाचे पाणी साचून त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यात मधोमध लाद्याचा खच, झाडे झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे डासांचा पैदास मोठ्या प्रमाणात झाला आहे. संबंधित कंपनीला याचे काहीएक पडलेले नसल्याने या ठिकाणी डेंग्यूसारख्या रोगाने डोके वर काढले आहे.तसेच येथील वाहतूक कार्यालयात दिवसाढवळ्या शेकडो नागरिक आपल्या कामासाठी येतात. त्यांना डासांचा त्रास सहन करावा लागतो. डेंग्यू सदृश्य डासाने चावा घेतला तर घातक ठरु शकतो. ते माहिती पडत नसल्याने डेंग्यूने डोके वर काढले आहे.

दरम्यान बैठकीस गॅमन इंडियाच्या अधिकाऱ्याने उपस्थिती लावली होती. मात्र त्यांनी लोकांच्या हिताचा विचार न केल्याने आज त्यांनी त्यांच्या कामामुळे झालेली घाण तशीच ठेवली आहे. तेथे साफ सफाई करण्याचे त्यांनी सोयीस्कर समजले नाही. संबंधितांनी त्यांची कान उघाडणी करण्याचे गरजेचे आहे. अन्यथा डेंग्यूचा प्रसार वाढतच जाणार यात शंका नाही. संबंधितांनी सदर कंपनीवर कारवाई करून त्या ठिकाणी झालेली घाण दूर करण्यास त्यांना परावृत्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com