Goa: स्थायी समितीने केला जाहिरात फलकांमध्ये घोटाळा, परशुराम सोनुर्लेकरांचा आरोप

गोवा फर्स्टने माहिती हक्क कायद्या अंतर्गत विचारले असता तो कंत्राटदार जाहिरात फलकाचे दोन लाखापेक्षा जास्त रक्कम पालिकेला देणे आहे.
Goa: स्थायी समितीने केला जाहिरात फलकांमध्ये  घोटाळा, परशुराम सोनुर्लेकरांचा आरोप
वास्को स्वतंत्र पथ मार्गावरील मुरगाव पालिकेच्या उद्यानात पालिका मंडळाची परवानगी नसतांना लावलेले जाहिरात फलकDainik Gomantak

दाबोळी: मुरगाव नगरपालिकेच्या हुतात्मा चौकात 2019 मध्ये पालिका मंडळाने जाहिरात फलक लावण्याची परवानगी एका कंत्राटदाराला दिली होती. आज पर्यंत या कंत्राटदाराने पालिकेला साधा पैसा सुद्धा दिलेला नाही. या प्रकरणी गोवा फर्स्टने माहिती हक्क कायद्या अंतर्गत विचारले असता तो कंत्राटदार जाहिरात फलकाचे दोन लाखापेक्षा जास्त रक्कम पालिकेला देणे आहे. तसेच नव्याने पालिकेच्या उद्यानात (Municipal Park) लावलेल्या जाहिरात (Advertising) फलकांची परवानगी स्थायी समितीने दिली असून यात सुद्धा घोटाळा असल्याचा आरोप गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

वास्को स्वतंत्र पथ मार्गावरील मुरगाव पालिकेच्या उद्यानात पालिका मंडळाची परवानगी नसतांना लावलेले जाहिरात फलक
सौंदत्ती येथील यल्लमा मंदिरात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना एंट्री पण भक्तांनी बंदी

2019 मध्ये मुरगाव नगरपालिका मंडळाने बैठकीत निर्णय घेऊन वास्को हुतात्मा चौकात एका कंत्राटदाराला जाहीर दर महिन्याला रुपये 6600/ - भाडे आकारून जाहिरात फलक लावण्याची परवानगी दिली होती. पण त्या कंत्राटदाराने गेली दोन वर्षे पालिकेला एकही पैसा भाड्याच्या रुपाने दिलेला नाही अशी माहिती गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे. या प्रकरणी सोनुर्लेकर यांनी मुरगाव नगरपालिकेत माहिती हक्क कायद्याअंतर्गत माहिती मागितली असता 2019 मध्ये हुतात्मा चौकात जाहिरात फलक लावणाऱ्या कंत्राटदाराने आजपर्यंत साधा पैसा सुद्धा दिला नाही. यावरून पालिका केवढी सक्षम आहे ते समजते. एखाद्या घरमालकाने घरपट्टी भरली नाही तर पालिकेचे निरीक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावून तुझ्या घरावर कारवाई करणार असे ठणकावून सांगतात. मात्र त्या कंत्राटदाराला आजपर्यंत एकही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा नगरसेवकांनी दोन लाखापेक्षा जास्त असलेल्या थकबाकी प्रकरणी विचारलेले नाही. याविषयी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पुढील कृती आखावी किंवा हुतात्मा चौकातील जाहिरात फलक तेथून काढून टाकावे. तसेच दोन लाख थकबाकी न देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी केली.

वास्को स्वतंत्र पथ मार्गावरील मुरगाव पालिकेच्या उद्यानात पालिका मंडळाची परवानगी नसतांना लावलेले जाहिरात फलक
Goa: माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी कार्यकर्त्यांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान वास्को स्वतंत्र पथ मार्गच्या बाजूस असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या उद्यानात नव्याने जाहिरात फलक लावण्यात आले आहे. सदर उद्यानात विद्यमान पालिकेच्या स्थायी समितीने उद्यानात फलक लावण्याची परवानगी दिली असल्याची माहिती सोनुर्लेकर यांनी दिली आहे. जर एखाद्या पालिकेच्या हद्दीत जर फलक लावण्याचे कंत्राट द्यायचे असेल तर त्याला नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या बैठकीत परवानगी देणे महत्त्वाचे आहे. सदर उद्यानात जाहिरात फलक लावण्यासाठी पालिका बैठकीत परवानगी घेतली नसल्याने यात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गोवा फर्स्टचे निमंत्रक सोनुर्लेकर यांनी केली. लाखो करोडो रुपयांची थकबाकी येणे असतानासुद्धा पालिका थकबाकी वसूल करण्यात असमर्थ असल्यासारखे कार्य करीत असल्याची टीका सोनुर्लेकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com