Goa: डिचोलीत 'देश प्रथम' सप्ताहाला प्रारंभ

सम्राट क्लबचा उपक्रम, मुळगावात उदघाटन (Goa)
Goa: डिचोलीत 'देश प्रथम' सप्ताहाला प्रारंभ
Tree distribution by the Samrat Club, BicholimTukaram Sawant / Dainik Gomantak

डिचोली: डिचोली (Bicholim) सम्राट क्लबतर्फे 'देश प्रथम' (Country first) सप्ताहाला प्रारंभ झाला असून, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत (Independence Day) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिरोडवाडी-मुळगाव येथील सरकारी शाळेत आयोजित कार्यक्रमात या सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले. या सोहळ्यास सम्राट क्लबचे (Samrat Club) अध्यक्ष गुरूदास कोरगावकर, सचिव गोपाळ मोरजकर, कार्यक्रम प्रमुख यदुनाथ शिरोडकर, कार्यक्रम समन्वयक मुकूंद तार आदी उपस्थित होते. (Goa)

Tree distribution by the Samrat Club, Bicholim
Goa: मडगाव भाजप युवा मोर्चाची स्थापना

यदुनाथ शिरोडकर यांनी कंट्री फर्स्ट सप्ताहाचे महत्व विशद केले. यावेळी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना झाडांची रोपटी वाटप करण्यात आली.प्रत्येकांनी निदान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे.असा संदेश यावेळी करण्यात आला. मुकूंद तार यांनी ही रोपटी पुरस्कृत केली होती. उपस्थितांनी देश प्रथम अंतर्गत शपथ घेतली. शाळेच्या शिक्षकवर्गातर्फे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. स्वागत गुरुदास कोरगावकर यांनी केले. गोपाळ मोरजकर यांनी आभार मानले. या सोहळ्यास प्रसाद नाईक, दयानंद घाटवळ, रोहिदास गाड, श्रीधर मयेकर, भगवान हरमलकर आदी सम्राट क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.