गोवा: 'गोयकार घर' मध्ये लसीकरण केंद्र सुरु करा; सरदेसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोवा: 'गोयकार घर' मध्ये लसीकरण केंद्र सुरु करा; सरदेसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Goa Start Vaccination Center at Goykar Ghar Sardesais letter to the Chief Minister

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे फातोर्डा येथील कार्यलय असलेले 'गोयकार घर' कोविड लसीकरण केंद्र म्हणून वापरण्यास देण्याची तयारी विजय सरदेसाई यांनी दाखवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना एक पत्र लिहून त्यांनी या कामासाठी गोयकार घराचे दरवाजे खुले असतील असे म्हटले आहे. आपल्या पक्षाच्या या कार्यालयात लसीकरण केंद्रासाठी जागा तयार करण्याची आपली तयारी आहे. लसीकरण ही सध्याची राष्ट्रीय गरज असून यासाठी कुठलाही राजकीय फायदा न बघता फक्त गोवेकारांचे हित लक्षात घ्यायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. (Goa Start Vaccination Center at Goykar Ghar Sardesais letter to the Chief Minister)

सध्या गोव्यात कोविड महामारीने पुन्हा उग्र रुप धाऱण केलेले असताना कोविड चाचण्या वाढवण्याबरोबरच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करणे, सामाजिक अंतर ठेवण्यावर कटाक्षाने भर देणे, ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलणे आणि गोवेकारांना जास्तीत जास्त लवकर लस देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही महामारी दूर करण्यासाठी सर्व गोमांतकीयांनी एकत्रित येऊन प्रयत्न करून गोवेकार कसे काम करू शकतात हे देशाला दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

लसीकरण्याच्या कामासाठी गोयकार घर देण्याची आपण दाखवलेली तयारी ही विरोधी पक्षाचा आमदार म्हणून नव्हे तर एक गोयकार या नात्याने आहे. लोकांच्या हितासाठी वावरण्याची शपथ आपण आमदार म्हणून घेतली आहे. राजकारणापेक्षा गोय, गोयकार आणि गोयकारपण याला आपण प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या महमारीच्या काळात कणखरपणे निर्णय घेण्याची गरज असून सरकारी आणि खाजगी इस्पीटलात उपलब्ध खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता आणि इतर माहिती लोकांना मिळावी यासाठी कोविड कमांड केंद्र स्थापन करण्याची गरज त्यानी व्यक्त केली.

सध्या प्रशासकीय गैरव्यावस्थापनामुळे योग्य त्या सुविधाविना लोकांना त्रास सहन करावा लागतो, तो क्लेषदायक असून या स्थितितून बाहेर येण्यासाठी लवकरात लवकर कोविड लस टोचून घ्यावी असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com