गोवा स्टार्टअप धोरण बंद नव्हे, मुदतवाढ - जेनिफर मोन्सेरात

UNI
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

गोवा स्टार्टअप धोरण बंद झालेले नसून त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच गोवा माहिती तंत्रज्ञान धोरण हे आणखी तीन वर्षे वैध असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी आज विधानसभेत दिली. शून्य तासाला पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी हा विषय उपस्थित केला होता.

पणजी - गोवा स्टार्टअप धोरण बंद झालेले नसून त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच गोवा माहिती तंत्रज्ञान धोरण हे आणखी तीन वर्षे वैध असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी आज विधानसभेत दिली. शून्य तासाला पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी हा विषय उपस्थित केला होता. 

मंत्र्यांनी सांगितले स्टार्टअप धोरणाची मुदत २८ सप्टेंबरला संपली होती, तिला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे हे धोरण आता २७ मार्च पर्यंत वैध आहे. माहिती तंत्रज्ञान धोरण हे पाच वर्षासाठी तयार केले गेले आहे आणखी तीन वर्षे ते वैध आहे. या क्षेत्रात नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांना सरकारने प्रोत्साहन देणे सुरू ठेवले आहे. यासाठी यंदा ८९ लाख ९२ हजार १३५ रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. या योजनेत कोणताही खंड सरकारने पाडलेला नाही.

तत्पूर्वी खंवटे यांनी सांगितले, की या दोन्ही धोरणांची अंमलबजावणी बंद झालेली आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार करू पाहणाऱ्यांना अडचण उभी ठाकत आहे. कोविड काळात नव उद्योजक अनेक स्पर्धेत टिकू शकत नाहीत. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध उद्योग सुरू करून रोजगार देण्याची क्षमता अशा लोकांची आहे. त्यांना सरकारने मदत केली पाहिजे. धोरणा अभावी ही मदत सध्या बंद झालेली आहे.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या