‘गोमेकॉ’त दररोज कोरोनाचे ३० गंभीर रुग्‍ण: डॉ. शिवानंद बांदेकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

गोमेकॉमध्ये दररोज आयसीयूमध्ये ३० रुग्ण येतात. त्यामुळे आम्ही आता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आयसीयू वॉर्डची निर्मिती करण्याबाबत आपण पाहणी केली. त्याशिवाय दररोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये २० ते २५ रुग्ण न्युमोनियाचे सापडत आहेत. 

पणजी: राज्यात कोरोनामुळे दररोज बळी जाण्याची चिंता सतावत आहे. दररोज गोमेकॉतील अतिदक्षता विभागात (आयसीयू) ३० नवे रुग्ण दाखल होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.

डॉ. बांदेकर यांनी स्थानिक खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. गोमेकॉमध्ये दररोज आयसीयूमध्ये ३० रुग्ण येतात. त्यामुळे आम्ही आता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आयसीयू वॉर्डची निर्मिती करण्याबाबत आपण पाहणी केली. त्याशिवाय दररोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये २० ते २५ रुग्ण न्युमोनियाचे सापडत आहेत. 

गोमेकॉमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला दाखल करून घ्यावे, असे वाटते. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही आता मृत्यू होणाऱ्या लोकांच्या आजाराचे कारणही बुलेटिनमध्ये देत आहोत. त्यातील अनेक जणांचा मृत्यू हा २४ तास अगोदर, सहा तास अगोदर रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसून येते. 

गंभीर स्थितीत ऐनवेळी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे अवघड होते.  कोरोना महामारीचा सामूहिक संसर्ग वाढू नये यासाठी पुढील सहा महिने सोहळे आणि उत्सव टाळावेत, असे आवाहन डॉ. बांदेकर यांनी केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या