राज्यातील अंगणवाड्या होणार ‘डिजिटल’

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

या उपक्रमाअंतर्गत आता अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. यामध्ये टॅबचा वापर कसा आणि कोणत्या माहितीसाठी तसेच कामासाठी करावा या प्रक्षिणक्षणासह ऑनलाईन कामे कशी करावीत या कामांचाही समावेश आहे.

पणजी: राज्यातील अंगणवाड्या लवकरच डिजिटल होणार आहेत. महिला आणि बाळ कल्याण विकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक अंगणवाडीमध्ये आता १५ टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या राज्यातील ४२ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमाअंतर्गत आता अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. यामध्ये टॅबचा वापर कसा आणि कोणत्या माहितीसाठी तसेच कामासाठी करावा या प्रक्षिणक्षणासह ऑनलाईन कामे कशी करावीत या कामांचाही समावेश आहे. मुलांना दाखविण्यासाठी व्हिडीओ कसे शूट करावेत आणि मग नंतर कसे अपलोड करावेत, याचेही धडे गिरवले जात आहेत.

खात्याच्या संचालक दीपाली नाईक अधिक माहिती देताना म्हणाल्या, राज्यातील अंगणवाडी सेविकांना आम्ही डिजिटल प्रशिक्षण तर देतच आहे. पण याशिवाय टॅब, मोबाईल आणि संगणकासारख्या गोष्टीहि त्यांना वापरात याव्यात आणि याबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्ह्णूनही आमचे प्रयत्न सुरु आहेत. लोकांच्या अडचणी आणि समस्याही आता खात्याकडे ऑनलाईन पद्धतीने येत आहेत. अशाच पद्धतीने डिजिटली महिलांनी आमच्याशी कनेक्ट व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या