गोवा विधानसभा अधिवेशन: "लोकांना तो प्रकल्प नको असेल तर सरकार परवानगी देणार नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

खासगी क्रीडा संकुल उभारण्यासाठी खोटा अहवाल नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आल्याचा प्रकार हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांनी आज विधानसभेत उघड केला.

पणजी: कारोणा हळदोणे येथे खासगी क्रीडा संकुल उभारण्यासाठी खोटा अहवाल नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आल्याचा प्रकार हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांनी आज विधानसभेत उघड केला.

ते म्हणाले, कोमुनिदाद जमीन तेथे आहे. ती क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यावर खासगी क्रीडा संकुल उभारण्यासाठी  प्रयत्न झाला. नगर नियोजन खात्याने या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी दिली होती. मात्र या प्रकल्पाला ग्रामसभेत विरोध करण्यात आला त्यानंतर तांत्रिक परवानगी मागे घेतलेली आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी पाच मीटर रुंद रस्ता असतानाही तो आठ मीटर आहे असे नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी दाखवले त्यामुळे परवानगी मिळणे सोपे झाले. चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. यावर उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर म्हणाले की, दिलेली तांत्रिक मंजुरी मागे घेतलेली आहे. संबंधित याप्रकरण आता न्यायालयात गेले आहेत. लोकांना तिथे तसा प्रकल्प नको असेल तर सरकार परवानगी देणार नाही.

गोवा विधानसभा अधिवेशन : राज्यात कर्ज घेणे सोपे होणार -

देशाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या