गोवा विधानसभा अधिवेशन: "विरोधकांनी विधानसभेत भाजप पक्षावर केली ती टीकाअकारणच"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याचे विधानसभा अधिवेशनात सिद्ध झाले असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे सांगितले. ते म्हणाले विरोधकांनी भाजप पक्षावर विधानसभेत टीका केली ती अकारण होती.

पणजी: विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याचे विधानसभा अधिवेशनात सिद्ध झाले असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे सांगितले. ते म्हणाले विरोधकांनी भाजप पक्षावर विधानसभेत टीका केली ती अकारण होती. त्यांनी सरकारवर मुद्यांच्याआधारे टीका करायला पाहिजे होती. ते म्हणाले, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा हे एक व्यासपीठ असते. भले त्या वेळी सरकारवरही टीका होऊ शकते, मात्र भाजप पक्षावर टीका करण्यावरून यावरून भाजपच्या सरकारने केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांना आलेले नैराश्य दिसून येते.

भाजपने नेहमीच विकासाचे राजकारण केले सर्वांना सोबत घेऊन विकास केला. तो अनेकांना भावला नसेल. जे विधानसभेत येऊन उत्तर देऊ शकत नाहीत अशांच्या नावाचा उल्लेख विधानसभेत टीका करताना केला जाऊ नये असे संकेत आहेत. तेही पाळले गेले नाहीत. भाजपच्या उमेदवारीवर जिल्हा पंचायतीत निवडून आलेल्या आणि नंतर जिल्हा पंचायत अध्यक्ष पदी निवड झालेल्यांवरही नाव घेऊन टीका करण्यात आली. चुकीचा पायंडा यामुळे पाडला जात आहे. जनतेला जाणवणाऱ्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांनी सरकारला विधानसभेत जरूर जाब विचारावा. सरकारचे म्हणणे ही त्याबाबत काही असेल तर तेही ऐकून घ्यावे. मात्र असे करताना वैयक्तिक पातळीवर टीका टाळली पाहिजे. मीही विधानसभेचा पूर्वी सदस्य होतो त्यावेळी कटाक्षाने मी वैयक्तिक टीका टाळली होती. विधानसभेतील कामकाज वेगळे आणि राजकीय आखाडा वेगळा हे ध्यानात घेऊन विधानसभा कामकाजाकडे सर्वांनी पाहिले पाहिजे, असे माजी आमदार म्हणूनही मला वाटते.

गोवा विधानसभा अधिवेशन: सरकारी खात्यांतील आर्थिक गैरव्यवहार  विधानसभेच्या पटलावर -

संबंधित बातम्या