Goan Project: पडीक फळांचा योग्य वापर करुन पर्यावरणपूर्वक खाद्यपदार्थांचे निर्माण!

गोवा राज्य जैवविविधता मंडळाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
Goan Brand
Goan BrandDainik Gomantak

पर्यावरणपूर्वक वस्तू निर्माण करून जैवविविधतेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने ‘गोवन ब्रँड’ सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत पडीक फळांचा वापर करून खाद्यपदार्थ निर्माण केले जात आहेत. गोवा राज्य जैवविविधता मंडळाकडून (Goa State Biodiversity Board) उपक्रम राबवण्यात आला असून लोणचे, रस, चिप्ससारखे पदार्थ यात आहे, अशी माहिती गोवा राज्य जैवविविधता मंडळाने ‘गोमन्तक’ला दिली.

राज्यात मोठ्या प्रमाणात फळे पडून वाया होत असल्याचे मंडळाने केलेल्या संशोधनातून माहिती समोर आली आहे. पडीक फळांचा योग्य वापर करून खाद्यपदार्थ निर्माण करण्याची युक्ती सरकारला सुचल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात फणस, करमल, काजू, आवळा, हळद, लिंबू, कोकम, खोला मिर्ची, आंबे, कैरी,केळी, नारळ, चिंच आणि रागी यांचा समावेश आहे.

Goan Brand
Vegan Vs Vegetarian Diet| वीगन आहार आणि शाकाहारी आहारातील हा फरक तुम्हाला माहित आहे का?

करमल आणि लिंबूचा वापर करून लोणचे बनवले जात असून हे सहा महिन्यांपर्यंत टिकणारे आहे. फणसचा वापर करून विविध पदार्थ केले जात आहे. चिप्स हा यातील प्रसिद्ध पदार्थ ज्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. तसेच आवळाचा रस, चिंच कँडी, कैरीचे लोणचे, हळद पावडर, भाजलेले काजू असे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

गोवन प्रकल्प हा मार्च 2021 मध्ये सुरू करण्यात आला होता. सध्या उत्पादन हे दोन ठिकाणी होत आहे, उत्तर गोव्यात साळ, डिचोली आणि दक्षिण पोंतेमळ, कुडचडे. परंतु लवकरच राज्‍यात इतर ठिकाणी देखील केंद्र येणार असून खाणपट्ट्यात हे असणार आहेत. यासंदर्भात मंडळाकडून सर्वेक्षण करण्यात आला आहे, त्यात खाणपट्ट्यात ही फळे उपलब्ध असल्याने येथे हे केंद्र येणार आहेत. प्रकल्प व्यावस्थापन पथक (पीएमयू) उत्तर आणि दक्षिण गोव्यात गठित केले आहे. त्या व्यतिरिक्त महिलांना देखील प्रकल्पात सहभागी केला गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन तयार झाले आहे.

Goan Brand
Diet In Dengue: डेंग्यूत प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करा आहारात या पदार्थांचा समावेश

आर्थिक फायदा: गोवन उपक्रम सुरू करून राज्य सरकार हे नागरिकांच्या सहभागाने राज्यातील जैव संसाधनांचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणे करून शाश्वत आणि अविनाशी माध्यमांच्या प्रणालीतून राज्याला आर्थिक फायदा होणार आहे. उपक्रमाद्वारे समाजातील दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहाचे साधन तयार केले गेले असून यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. उपक्रमाच्या माध्यमातून जैव संसाधनांचे संरक्षण करण्याची ऊर्जा नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. तसेच पुरुष आणि महिला यांना स्वयं रोजगार करण्याची संधी मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com