गोवा राज्य सहकारी बँकेला RBI ने ठोठावला दंड

गोवा राज्य सहकारी बँकेसह इतर बँकांचा ही समावेश
RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta DasDainik Gomant

भारतीय रिझर्व्ह बँकने आठ भारतीय बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या यादीत गोवा राज्य सहकारी बँकेचा ही समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने घालून दिलेल्या नियमावलीचे बंकांकडून पालन न झाल्याने हा दंड ठोवण्यात आला आहे. यात गोवा राज्य सहकारी बँकेचा ही नंबर लागला तसेच महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश आहे.

(Goa State Cooperative Bank fined by RBI)

RBI Governor Shaktikanta Das
Goa Congress: जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष; काँग्रेस नेते थेट राज्यपालांच्या भेटीला

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकने एकूण आठ भारतीय बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या कारवाईत गोवा राज्य सहकारी बँकेसह गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक वर ही कारवाई केली असून गुजरातच्या मेहसाणा कडून सर्वाधिक 40 लाख रुपयांचा दंड लगावण्यात आला आहे. इतर बँकांना तब्बल 1ते 40 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI Governor Shaktikanta Das
Amit Palekar : विलीन होणाऱ्या शाळा 'आप'ला दत्तक द्या

भारतीय रिझर्व्ह बँकने दंड ठोठावलेल्या बँकांची यादी पुढील प्रमाणे

छत्तीसगड राज्य सहकारी बँक

गोवा राज्य सहकारी बँक

गराहा सहकारी बँक

द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

जिल्हा सहकारी केंद्रीय बँक,छिंदवाडा

वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

मेहसाणा अर्बन आठ बँकांमध्ये सहकारी बँक

नेमकं काय कारण आहे बँकेला दंड ठोठावण्याचं

RBI ने 1 ऑगस्ट 2022 रोजी या संदर्भात आदेश जारी केला. बँकिंग नियमन कायदा, 1949 (अधिनियम) च्या कलम 56 चे पालन न केल्याबद्दल सहकारी बँकंना हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे RBI ने म्हटले आहे.

बँकेने आरबीआयला नॉन-बँकिंग मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती आणि सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी केली आहे, इतर गोष्टींचे बँकेने पालन केले नाही. असे निरीक्षण ही RBI ने नोंदवले आहे. तसेच कायद्यातील उपरोक्त तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ही बँकंना दंड का लागू करू नये, याची कारणे दाखवा अशी नोटीस ही RBI ने बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com