गोवा पर्यावरण आघात मुल्यांकन समितीची अधिसूचना केंद्रीय राजपत्रात प्रसिद्ध

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

शंभर हेक्टरखालील प्रकल्पांना पर्यावरण दाखला देण्याचा अधिकार असलेली राज्य पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य पर्यावरण आघात मुल्यांकन समिती केंद्रीय वन पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केली आहे.

पणजी : शंभर हेक्टरखालील प्रकल्पांना पर्यावरण दाखला देण्याचा अधिकार असलेली राज्य पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य पर्यावरण आघात मुल्यांकन समिती केंद्रीय वन पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केली आहे. तशी अधिसूचना केंद्रीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या अध्यक्षस्थानी ताळगाव येथील प्रा. सुहास गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी वीज मुख्य अभियंता रेश्मा मॅथ्यू या सदस्य तर पर्यावरण संचालक या प्राधिकरणाचे सचिव आहेत. या प्राधिकरणाकडे शिफारस करण्यासाठी प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी माडेल मडगाव येथील गौतम देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती अधिसुचित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यसचिवपदी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अभियंता आहेत. समितीचे अन्य सदस्य असे - डॉ. महेश ढवळीकर, डॉ. शैलेश भोसले, डॉ. बेंजामिन ब्रांगाझा, डॉ. दीपक गायतोंडे, डॉ. चंद्रशेखर रिवणकर, महेश पाटील, सुजीतकुमार डोंगरे,  संजय आमोणकर.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या