म्हादई प्रश्नी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

म्हादई नदीचे पाणी कुठून कसे वळवले गेले या विषयी आपण पुरावे जमा केले असून ते याचिकेसोबत सर्वोच्च न्यायालयाला सादर करू, असे त्यांनी म्हटले होते. म्हादई पाणीप्रश्नी काही लोक राजकारण करत आहेत. म्हादई हा विषय आपल्यासाठी काळजाचा आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले होते. 

पणजी- कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवून आपल्या राज्यात आणले. कर्नाटक सरकारच्या या कृती विरोधात गोवा राज्याकडून आज सर्वोच्च न्य़ायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली. ही माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी कोणतीही  तडजोड केली जाणार नाही. म्हादईच्या बचावासाठी अखेरपर्यंत या प्रश्नावर लढा देत राहू, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.  

म्हादई नदीचे पाणी कुठून कसे वळवले गेले या विषयी आपण पुरावे जमा केले असून ते याचिकेसोबत सर्वोच्च न्यायालयाला सादर करू, असे त्यांनी म्हटले होते. म्हादई पाणीप्रश्नी काही लोक राजकारण करत आहेत. म्हादई हा विषय आपल्यासाठी काळजाचा आहे. कारण आपण प्रारंभापासून म्हादई नदीच्या चळवळीत आहोत. विरोधकांसाठी मात्र हा राजकीय भांडवलाचा  विषय आहे. म्हादई नदीवर मी माझ्या आईपेक्षाही अधिक प्रेम करतो. केंद्र  सरकारचाही याबाबत माझ्यावर कोणताही दबाव नाही. पाण्याबाबत तरी केंद्र सरकार गोव्यावर निश्चित अन्याय करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.  

संबंधित बातम्या