गोवा सरकारच्या पर्यावरण खात्याचा उपक्रम झाडाच्या भुश्‍‍यापासून बनविणार विटा

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

माडाचे पिडे, करवंट्या, झाडे, झुडपांच्या फांद्या यंत्रात घातल्‍यानंतर त्‍यापासून तयार होणारा भुसा व त्‍यापासून विटा (ब्रिकेट) करण्याचा कारखाना राज्य सरकार साळगाव येथे उभारणार आहे.

पणजी : माडाचे पिडे, करवंट्या, झाडे, झुडपांच्या फांद्या यंत्रात घातल्‍यानंतर त्‍यापासून तयार होणारा भुसा व त्‍यापासून विटा (ब्रिकेट) करण्याचा कारखाना राज्य सरकार साळगाव येथे उभारणार आहे. त्या कारखान्याच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने देकार मागवण्याचे ठरवले आहे. राज्य ऊर्जा विकास यंत्रणा आणि पर्यावरण खात्याने या क्षेत्रात खासगी उद्योजकांनी यावे यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न चालवले होते. त्यानंतरही कोणीच पुढे न आल्याने सरकारनेच हा कारखाना उभारण्याचे ठरवले आहे. गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे सरकारने ठरवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २० टन दैनंदिन क्षमतेचा हा कारखाना असेल. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात पर्यावरण खात्याकडे ४ हजार चौरस मीटर मोकळी जमीन आहे. त्या जमिनीच्या परिसरात हा कारखाना उभारण्याविषयीची चर्चा राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कारखान्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या राज्यात ब्रिकेटचे उत्पादन होत नाही. 

दररोज ७ टन झाडांच्‍या फांद्याचा कचरा संकलित
पणजी महापालिका हद्दीत संकलीत केल्या जाणाऱ्या कचऱ्यात दररोज ७ टन झाडाच्या फांद्या, झावळ्या आदी साहित्य सापडते. त्या साहित्याचे काय करायचे हा महापालिकेसमोरील प्रश्न आहे. जमिनीत अशा वस्तू पुरून तरी किती पुरणार हा प्रश्न असल्याने त्यापासून ब्रिकेट तयार करणे हाच एकमेव उपाय सरकारसमोर आहे. त्याशिवाय तेलाच्या घाण्यात उर्वरित मळीपासूनही ब्रिकेट करता येते. त्या पर्यायावरही विचार सुरू आहे. या कारखान्याच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीही करण्यात 

संबंधित बातम्या