साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अपात्रता प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नाही...!

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व साखळी पालिका सत्ताधारी सगलानी गटातर्फे केले जात आहे. असा आरोप साखळी पालिकेतील भाजप समर्थक नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.
साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अपात्रता प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नाही...!
BJP corporatorsDainik Gomantak

साखळी: साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर (Raya Parsekar) व उपनगराध्यक्ष राजेश सावळ (Rajesh Sawal) हे आपल्या बेकायदेशीर कृत्यामुळे अपात्र झाले असून त्यांच्यावर न्यायालयीन खटला हा वैयक्तिकरित्या घालण्यात आला आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री किंवा सरकारचा कोणताच हस्तक्षेप नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) व भाजप सरकारची याप्रकरणी विनाकारण बदनामी करण्याचे षडयंत्र कॉग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) , कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व साखळी पालिका सत्ताधारी सगलानी गटातर्फे केले जात आहे. असा आरोप साखळी पालिकेतील भाजप समर्थक नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.

साखळी येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला भाजप समर्थक सहा नगरसेवक यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, रश्मी देसाई व शुभदा सावईकर यांची उपस्थिती होती.भाजप समर्थक नगरसेवक याशवंत माडकर यावेळी बोलताना म्हणाले कॉग्रेस च्या दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांनी सगलानी गटाबरोबर पत्रकार परिषद घेऊन साखळी पालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना अपात्र करुन साखळी पालिका ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड चालली आहे असा चुकीचा आरोप केला आहे. कामत व चोडणकर यांनी अगोदर साखळीत येऊन या अपात्र झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष संदर्भात माहिती जाणून घेऊन अभ्यास करावा उलट सुलट बिनबुडाचे आरोप करुन स्वताचेच हसे करुन घेऊ नये.

BJP corporators
Goa: सरकारचा खोटारडेपणा उघड, कोरोनात ऑक्सिजन कमतरतेमुळेच गोमेकॉत बळी

साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी आपल्या घराचा बेकायदेशीर विस्तार करुन तीन दुकानेही बेकायदेशीर थाटल्याने दि १२ एप्रिल २०२१ रोजी आपण स्वता वैयक्तिक अपत्रता याचिका दाखल केली होती तर उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या विरोधात त्यापुर्वी दि ८ जानेवारी २०२१ रोजी संतोष भामईकर या इसमाने बेकायदेशीर बांधकाम संदर्भात न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली होती. हा इसम भामईकर भाजपचा सदस्य सुध्दा नाही. दोन्हीही अपात्रता याचिका या वेगवेगळ्या दाखल करण्यात आलेल्या आहेत व या दोन्हीही अपात्रता याचिकांची न्यायालयीन सुनावणी मामलेदार, जिल्हाधिकारी व इतर संबंधितांकडे चालू होती या दोघांना कारणे दाखवा नोटीसीही ही पाठवल्या होत्या पण आठ ते दहा महिन्यात त्यांनी काहीच उत्तरे दिली नाहीत. कायद्याने दोघांचेही बेकायदेशीर गुन्हे सिध्द झाल्यानेच नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ दोघेही अपात्र झाले आहेत यामध्ये मुख्यमंत्री व सरकारचा कुठेच हस्तक्षेप नाही.असे माडकर म्हणाले

BJP corporators
Goa: ‘दाबोळी’ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद झाल्यास पर्यटन व्यवसायाला फटका

शैक्षणिक संस्थेला विरोध का करता ?

नगरसेवक माडकर पुढे म्हणाले साखळी गृहनिर्माण वसाहतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी साई नर्सिंग इन्स्टीट्युटसाठी सर्व कागदोपत्री व्यवहार करुन जागा घेतली काय बिघडले ? ही इन्स्टीट्युट विद्यार्थ्यांसाठी आहे. जनतेसाठी आहे अशा शैक्षणिक प्रकल्पाला विरोध करुन काय साधायचे आहे ? साखळी पालिकेतर्फे वसंत नगर या ठिकाणी निविदा व कायदेशीर सोपस्कार पार न पाडता बेकायदेशीर क्रीडा मैदान बांधण्यात आले त्याचाही सत्ताधारी पालिका मंडळाने जाब द्यावा.

मुख्यमंत्र्यांनाच दरवेळी दोषी का ठरवता ?

नगरसेवक माडकर पुढे म्हणाले कॉग्रेस व साखळी पालिकेतील सत्ताधारी गटाला साखळी पालिकेतील त्यांच्या विरोधातील प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरविण्याची सवयच झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे चाललेले विकासाचे काम या लोकांना पाहवत नाही म्हाणून मुख्यमंत्र्यांवर उलटसुलट खालच्या पातळीवर आरोप केले जात आहेत. कॉग्रेसच्या दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांना मी सांगू इच्छितो की कॉग्रेस सोडून लोक इतरत्र जात आहेत त्यांच्याकडेच लक्ष पुरवा साखळीकडे लक्ष देऊ नका. साखळीत लक्ष द्यायला साखळीचे आमदार मुख्यमंत्री व कार्याकर्ते सक्षम आहेत. असे माडकर म्हणाले.

BJP corporators
Goa: साखळीमध्ये भाजपची दांडगाई

मी माझ्या जागेतच कायदेशीर घर बांधले

नगरसेवक शुभदा सावईकर म्हणाल्या मी गृहनिर्माण वसाहती मध्ये माझ्याच जागेवर घराच्या विस्ताराचे कायदेशीर बांधकाम केले होते. कुणीतरी तक्रार केल्यानंतर मी साखळी पालिकेच्या सत्ताधारी मंडळाला पाठिंबा देत नसल्याने साखळी पालिकेतर्फे "ना हरकत दाखला" मागे घेतला व माझ्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली. मी बांधकाम बंद ठेवले आहे व न्यायालयीन खटला चालू आहे. मी कायद्याची लढाई जिंकणार आहे. मी अपात्र होण्याचा प्रश्नच नाही.साखळी पालिका सत्ताधारी मंडळ असंख्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचा आरोप सावईकर यांनी केला.

मोफत पाण्याच्या टाक्या कुठे गेल्या ?

साखळी पालिकेचे सत्ताधारी मंडळ जनतेला बोगस आश्वासने देऊन दिशाभूल करीत आहेत असा आरोप नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी केला. लोकांना पाण्याच्या मोफत टाक्या गणेश चतुर्थीपुर्वी देण्याचे आश्वासन दिले होते.कुठे गेले ? लोकांना दुकानांना व घरांना नंबर देण्यासाठी विविध कायद्यांचा बगडा दाखवून पालिका कार्यालयात हेलपाटा घालायला लावले जाते पण स्वताचे घर व दुकाने मात्र बेकायदेशीर बांधले गेले आहे म्हणूनच नगराध्यक्ष राया पार्सेकर कायद्याने अपात्र ठरला आहे. न्यायालयाची धमकी देऊ नये. न्यायालयातही आमचाच विजय होणार असे नगरसेवक बोर्येकर म्हणाले.

BJP corporators
Goa: बेड्या घालून न्यायालयात आणू नये यासाठी केला अर्ज

सत्ताधारी मंडळामुळेच साखळीचा विकासाचा खोळंबला साखळी पालिका क्षेत्राचा जो काही विकास झाला तो मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्यामुळेच सरकारच्या प्रयत्नामुळेच झाला आहे. साखळी पालिकेच्या सगलानी गटाच्या सत्ताधारी मंडळाने केवळ थापाच मारण्याचे व विकासात खो घालण्याचेच काम केले आहे.असा आरोप नगरसेवक आनंद काणेकर यांनी केला.साखळी बाजारात मार्केट कॉम्लेक्स मंजूर झाले आहे पण त्याला मुख्यमंत्र्यांना श्रेय मिळेल म्हणून पालिकेची मंजूरी देण्यात येत नाही. साखळीच्या विकासाला आडकाठी आणल्यास साखळीतील जनता गप्प बसणार नाही असा इशारा काणेकर यांनी दिला. साखळी पालिकेतील १७ कंत्राठी कामगारांना सेवेतून काढून टाकण्याचा प्रयत्न साखळी पालिकेतील सत्ताधारी गटाने चालविला आहे. लोकांच्या पोटाच्या आड येण्याचा यांना अधिकार कुणी दिला ? असा प्रश्नही नगरसेवक काणेकर यांनी केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com