Sport Tourism in Goa: गोव्यात स्पोर्ट टुरिझमसाठी सरकार प्रयत्नशील - मंत्री रोहन खंवटे

ईडीएम महोत्सवाला गोमंतकिय सस्कृतीची जोड देणार
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

गोव्यात स्पोर्ट टुरिझम सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे केंद्र सरकार सोबत चर्चा करून यासंबंधी निर्णय घेतला जाईल अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. राज्यात चार दिवसीय महोत्सवाचं आयोजन करून त्याला गोमंतकीय संस्कृतीची जोड देणार असल्याचेही ते म्हणाले. पणजी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले असता माध्यमांशी संवाद साधत त्यांनी ही माहिती दिली आहे.

(Goa State Govt Strives for Sea Sports Tourism in Goa - Minister Rohan Khante )

Rohan Khaunte
Goa petrol and Diesel Rate: जाणून घ्या, राज्यातील पेट्रोल, डिझेल अन् LPG गॅसचे दर

गोव्यात स्पोर्ट टुरिझम सुधारण्यासाठी सरकार सकारात्मक असताना यामध्ये समूद्र किनाऱ्यावरील क्रिकेट, किनाऱ्यावरील हॉलीबॉल, किनाऱ्यावरील इतर खेळ आहेत. ते सुरु करण्यासाठी आपण विचार करत आहोत असं ही ते म्हणाले.

यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं ही खंवटे म्हणाले. समूद्र किनाऱ्यावरील आंतराष्ट्रीय क्रिकेट, हॉलीबॉल या खेळांसाठी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू यात कसे सहभागी होतील, यासाठी ही आपण प्रयत्नशिल असल्याचं ते म्हणाले.

Rohan Khaunte
Margao : 'होलसेल मासळी मार्केट सोपो कंत्राटाबाबत आता सरकारकडून घेणार सल्ला'

मद्यपी वाहन चालकांवरील कारवाईचे केले स्वागत

गोवा राज्यातील अपघाताचे सत्र रोखण्यासाठी वाहतूक पोलिस सक्रिय झाले आहेत. मंगळवारी रात्री राज्यात दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी पाच ठिकाणी एकाच वेळी पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटरच्या सहाय्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची कडक तपासणी सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे मद्यप्राशन करून गाडी चालविल्यास आणि तो दोषी आढळल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. सध्या सापडणाऱ्या संशयितांची वैद्यकीय चाचणीही घेण्यात येईल. शिवाय त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल. या मद्यपी वाहन चालकांवरील कारवाईचे मंत्री खंवटे यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com