Goa Rain Update|पावसाची ‘नर्व्हस 90’; शतक पार होता होईना

आतापर्यंत राज्यात 100 इंच इतका देखील पाऊस बरसलेला नाही.
Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomantak

पणजी: यंदा राज्यावर पावसाने वक्रदृष्टीच फिरवली आहे की काय अशी चिंता वाटू लागली आहे. कारण, आतापर्यंत राज्यात 100 इंच इतका देखील पाऊस बरसलेला नाही. ही एका प्रकारे चिंतेचीच बाब आहे. आतापर्यंत 2329.5 मिलीमीटर म्हणजेच केवळ 94.11 इंच पावसाची नोंद झाली आहे.

(goa state has not received even 100 inches of rain)

Goa Rain Updates
Suella Fernandes: ब्रिटनच्या पुढील गृहमंत्री सुएला फर्नांडिस यांचे गोव्याशी आहे विशेष नाते

राज्यात आतापर्यंत 2762.3 मि.मी. म्हणजेच 108.७५ इंच पाऊस बरसणे अपेक्षित होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 80 इंचाहून अधिक पाऊस बरसला होता व त्यावेळी राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होता. मात्र, त्यानंतर 90 इंच पाऊस व्हायला तब्बल 20 दिवसांचा अवधी लागला. 22 ऑगस्ट रोजी पावसाने नव्वदी आलांडली होती, म्हणजेच 91. 70 इंच पाऊस बरसला होता. गेल्या पंधरा दिवसात राज्यात केवळ 4 इंच एवढा पाऊस बरसला. ऑगस्टमध्ये केवळ 14.12 इंच पावसाची नोंद आहे. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 13.5 टक्के पावसाची कमतरता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com