राज्याचे विधानसभा अधिवेशन 25 जानेवारीपासून

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

राज्य विधानसभा अधिवेशनाला मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून पुढील वर्षात २५ जानेवारीपासून हे अधिवेशन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. 

पणजी- राज्य विधानसभा अधिवेशनाला मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून पुढील वर्षात २५ जानेवारीपासून हे अधिवेशन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. 

या अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्प सादर होणार नसून नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्च-एप्रिल दरम्यान होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
तसेच पंचायतराज कायद्यात दुरूस्ती करून पंचायतींच्या खर्चमर्यादा वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावेळी घेण्यात आला. तसेच पालिका हद्दींमध्ये 'स्वयंपूर्ण गोवा' ही संकल्पना राबवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

तमणार अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना गोव्यात अनेक ठिकाणी असे प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. कारण राज्यात अजूनही अखंडीत वीजपुरवठा होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

संबंधित बातम्या