Goa State Waste Management Corporations: राज्यात घातक कचऱ्यावरील प्रक्रिया मंदावली

तळोजा येथे पाठवणे बंद : पिसुर्लेतील प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता अपुरी असल्याने येतो ताण
Waste Management
Waste ManagementDainik Gomantak

Goa State Waste Management Corporations महाराष्ट्रातील तळोजा येथे घातक कचरा पाठवणे बंद केले असले तरी राज्यात निर्माण होणाऱ्या घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता राज्याने अद्याप विकसित केलेली नाही.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत घातक कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असली, तरी त्या प्रकल्पाची क्षमता अपुरी पडत असल्याचे दिसून येते.

प्रदूषणांच्या मानकावर घातक उद्योग हे लाल वर्गात येतात. त्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्यातील घातक घटक वेगळे काढून तो कचरा हानिमुक्त करण्यासाठी विशेष प्रक्रिया करावी लागते. गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळाने तसा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

Waste Management
37th National Games: अवघ्या दीड महिन्यांवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; आयोजनातली अनागोंदी उघड, 'ही' महत्वाची कामे प्रलंबित

त्याआधी तळोजा येथे खास वाहनांतून या कचऱ्याची वाहतूक करावी लागे. घातक कचरा हाताळणीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची नजर असते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ अधून-मधून त्या ठिकाणाची पाहणी करत असते.

तळोजा येथे हा घातक कचरा पाठवण्यात येत होता. आता तळोजा येथे कचरा पाठवणे जवळपास बंदच केले आहे.

Waste Management
Goa Police: सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या हवालदाराची तडकाफडकी बदली

पिसुर्लेत सशुल्क सेवा

पिसुर्ले येथे घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शुल्क आकारले जाते. उद्योगांकडून हे शुल्क भरल्यानंतरच कचरा त्या ठिकाणी स्वीकारण्यात येतो.

पिसुर्ले येथे उच्च दाबाखाली हा घातक कचरा जाळून नष्ट करण्याचीही व्यवस्था आहे. त्यातील काही कचरा हा जमिनीत गाडावा लागतो. काही कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवला जातो. तो पुन्हा वापरात आणला जातो.

Waste Management
मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि अवघ्या 24 तासांतच आर्च बिशपांची ख्रिस्ती धर्मगुरूंना तंबी, म्हणाले पूर्ण ख्रिस्ती समुदायाने...

राज्यातील घातक कचऱ्याचे प्रमाण

  • घातक कचरा निर्माण करणारे उद्योग - १६२८

  • घातक कचरा प्रक्रिया क्षमता - १६,८४६ टन प्रतिवर्ष

  • जाळता येण्याजोगा कचरा - ३९,३७९.८० टन प्रतिवर्ष

  • जमिनीत गाडावा लागणारा कचरा - ३,३८५.२१ टन प्रतिवर्ष

  • पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा - ३,३०९५.५७ टन प्रतिवर्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com