गोवा विधानसभा अधिवेशन: गोवा सरकारच्या पैशाने बांधलेल्या महाविद्यालयास खासगी व्यक्तीचे नाव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

काणकोण येथे सरकारी जमिनीवर सरकारने बांधलेल्या इमारतीत असलेल्या महाविद्यालयास एका खाजगी व्यक्तीने आपले नाव दिल्याचा प्रकार बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज विधानसभेत उघड केला.

पणजी: शाळांत मध्यान्ह आहार पुरवण्यासाठी महिला स्वयंसेवी गटांकडून दरपत्रक मागवण्यात आले आहे. सरकार अशा गटांकडे माध्यान्ह आहार पुरवण्याचे काम सोपवण्याचा विचार करत आहे, असे निवेदन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केले. मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी हा विषय उपस्थित केला होता.

ते म्हणाले कोविड महामारीच्या काळात शाळांना माध्यान्ह आहार पुरवणे बंद झाले आहे. यामुळे महिला स्वयंसेवी गटांचे काम बंद झाले आहे. हे गट आर्थिक संकटात आहेत. सरकारने याचा विचार केला पाहिजे. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला आज बेरोजगार झाल्या आहेत. पूर्वी भाजप सरकारच्या काळातच हे गट स्थापन करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू पाहत आहे त्या विरोधातील हे वातावरण आहे. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून या गटांना काम मिळेल याची व्यवस्था करायला हवी.

गोवा विधानसभा अधिवेशन: उपमुख्यमंत्री पर्यटकांसाठी सुरक्षारक्षक नेमणार तर बांधकाम मंत्री वाहतूक नियंत्रण दिवे लावणार -

काणकोण येथे सरकारी जमिनीवर सरकारने बांधलेल्या इमारतीत असलेल्या महाविद्यालयास एका खाजगी व्यक्तीने आपले नाव दिल्याचा प्रकार बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज विधानसभेत उघड केला. ते म्हणाले सरकारी महाविद्यालयाला खासगी व्यक्तीचे नाव कसे देता येईल, कारण ती इमारत सरकारने सरकारच्या जमिनीवर बांधलेली आहे.  सरकारच्या पैशाने बांधलेल्या इमारतीला खासगी व्यक्तीचे नाव देण्याच्या या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी शिक्षण संचालक आणि उच्च शिक्षण संचालकांना अशा राज्यभरातील प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश आपण देत आहे असे नमूद केले.

गोवा विधानसभा अधिवेशन: आकाश दिवे लावणाऱ्या त्या दामपत्याला सरकारी मदत मिळावी -

 

संबंधित बातम्या