गोवा विधानसभा अधिवेशन: उपमुख्यमंत्री पर्यटकांसाठी सुरक्षारक्षक नेमणार तर बांधकाम मंत्री वाहतूक नियंत्रण दिवे लावणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

काणकोण तालुक्यातील काब-द-राम किल्ला परिसरात सुरक्षारक्षक नाही. यामुळे तेथे जाणारे पर्यटक सुरक्षित नसल्याकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले.

पणजी: काणकोण तालुक्यातील काब-द-राम किल्ला परिसरात सुरक्षारक्षक नाही. यामुळे तेथे जाणारे पर्यटक सुरक्षित नसल्याकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी तेथे एक सुरक्षारक्षक आहे आणखीन एक नियुक्त करण्याचा विचार करू असे उत्तर दिले. कामत म्हणाले, तेथे पर्यटकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आता वाढले आहे अनेक लोक सहलीसाठी तेथे जातात सायंकाळ नंतरही तेथे पर्यटकांचा वावर असतो. स्थानिकांचा वावर असतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तेथे सुरक्षा रक्षक तैनात करणे जरुरीचे आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन:  वित्तीय मागण्‍यांचे विधेयक सादर झाल्‍यानंतर... -

मडगावच्या पश्चिम बगल मार्गावर नुवे ते वेर्णा दरम्यान वाहतूक नियंत्रण करणारे स्वयंचलित दिवे बसवावेत तसेच गतिरोधक घालावेत अशी मागणी नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान यांनी आज विधानसभेत केली. ते म्हणाले, सामाजिक जबाबदारी योजनेतून एक कंपनी असे स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवे बसविण्यात तयार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ना हरकत दाखला हवा आहे. पूर्वी या रस्त्यावरून केवळ एकेरी वाहतूक होत असे, आता दोन्ही बाजूचे मार्ग खुले झाल्याने रहदारी वाढली आहे. नुवे ते वेर्णा दरम्यान संभाव्य होऊ शकणारे अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवे बसवणे आणि गतिरोधक घालणे गरजेचे आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी नोंद घेऊ, योग्य ते करू असे आश्वासन दिले.

गोवा विधानसभा अधिवेशन: विदेशी गोमंतकीय नागरिकांसाठी गोव्यात लग्न करणं होणार सोप्पं -

संबंधित बातम्या