गोवा विधानसभा अधिवेशन: विदेशी गोमंतकीय नागरिकांसाठी गोव्यात लग्न करणं होणार सोप्पं

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

मूळ गोमंतकीय असलेल्या पण आता विदेशी नागरिकत्व धारण केलेल्‍यांना  येथे विवाह नोंदणीसाठी एक महिना रहिवासी दाखला घेण्याच्या सक्तीतून सूट मिळावी अशी मागणी कुडतरी चे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज विधानसभेत केली.

पणजी: मूळ गोमंतकीय असलेल्या पण आता विदेशी नागरिकत्व धारण केलेल्‍यांना येथे विवाह नोंदणीसाठी एक महिना रहिवासी दाखला घेण्याच्या सक्तीतून सूट मिळावी अशी मागणी कुडतरी चे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज विधानसभेत केली.

ते म्हणाले, केवळ लग्न करण्यासाठी जे विदेशी नागरिक गोव्यात येतात त्यांना एक महिना थांबावे लागते. त्यांना एक महिना वास्तव्याचा दाखला मिळत नाही. यातून सरकारने मार्ग काढला पाहिजे  ते आता जरी विदेशी नागरिक असले तरी ते मूळचे गोव्याचे आहेत. ते आपल्या मूळ ठिकाणी लग्न करण्यासाठी येतात याचा विचार सरकारने करावा. यावर कायदा मंत्री नीलेश काब्राल यांनी न्यायालयात जाऊन यातून सूट घेता येते असे नमूद केले. ते म्हणाले, पोर्तुगीजकालीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती सरकार नेमणार आहे. त्या समितीने अहवाल दिला की त्या कायद्यात कोणते बदल करता येतील याचा विचार सरकार करेल. मात्र तूर्त न्यायालयाकडून असे केवळ विवाह करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या मूळ गोमंतकीय पण सध्या विदेशी नागरिक असलेल्या ना दिलासा मिळू शकेल. सरकार यात या टप्प्यावर काही करू शकणार नाही.

गोवा विधानसभा अधिवेशन : अग्निशस्त्र प्रशिक्षण अनिवार्य केल्याने अनेकांचे परवाने रखडले -

गोवा विधानसभा अधिवेशन:  वित्तीय मागण्‍यांचे विधेयक सादर झाल्‍यानंतर... -

संबंधित बातम्या