Goa Statehood Day: सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्याच्या मूल्यांची सांगड घालणारा गोवा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 30 मे 2021

गोवा राज्य 19 डिसेंबर 1961 मध्ये पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले असले तरी गोमंतकीयांना त्यानंतर वर्षभराने भारतीय नागरिकत्व देण्यात आले. गोव्यात 1963 मध्ये पहिले लोकनियुक्त सरकार सत्तारूढ झाले. मुक्ती नंतरच्या पहिल्या दोन वर्षात गोव्यावर लष्करी राजवट होती.

Goa Statehood Day: पूर्वेकडचे रोम अशी पूर्वी ओळख असलेल्या गोव्याने आता कात टाकलेली आहे. छोट्या राज्यांच्या श्रेणीत सर्वात विकसित राज्य अशी ओळख नव्याने आता निर्माण केलेली आहे. गोमंत भूमी असा उल्लेख प्राचीन दस्तावेजात असलेले हे गोवा राज्य कधीपासून अस्तित्वात आले याविषयी निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. भगवान परशुरामाने बाण मारून समुद्र मागे रेटला आणि ही भूमी निर्माण झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. गोवा राज्य 19 डिसेंबर 1961 मध्ये पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले असले तरी गोमंतकीयांना त्यानंतर वर्षभराने भारतीय नागरिकत्व देण्यात आले. गोव्यात 1963 मध्ये पहिले लोकनियुक्त सरकार सत्तारूढ झाले. मुक्ती नंतरच्या पहिल्या दोन वर्षात गोव्यावर लष्करी राजवट होती. 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळण्यापूर्वी गोवा दमण व दीव असे संघ प्रदेश अस्तित्वात होते. गोव्याचे आता बारा तालुके आणि  दोन जिल्हे आहेत. नितांत सुंदर समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांना गोव्याकडे खेचून आणतात. गोव्यात पूर्वी खनिज व्यवसायाचा जोम होता आणि गोव्यातील खनिज चीन व जपानला निर्यात केले जात (Goa Statehood Day Every tourist says I have fallen in love with Goa)

गोव्याला जो येतो तो या निसर्गरम्य भूमीच्या प्रेमात पडतो. गोव्याला भेट देणार्‍या असंख्य पर्यटकांच्या तोंडून हे कधीही ऐकता येते. शहरातील गुदमरणाऱ्या  गर्दीतून येथे आल्यास प्रथम जाणवतो तो वातावरणातील ताजेपणा. हिरवी झाडे , हिरवे डोंगर, नारळ सुपारीच्या बागा, मांडवी दुपारी सारख्या समुद्र संपन्न सरिता, आरामशीरपणे जगणारी माणसे, कोपर्‍यातील एखाद्या बारमध्ये बसून घेता येणारे ते मंदिरेचे  घुटके, सिगारेटच्या वलयात पडदानशीन झालेले चेहरे, यामुळे स्वतःच्या आयुष्यात हरवलेली माणसे स्वतःलाच येथे सापडतात.  त्या लयीत ते समुद्रकिनाऱ्यांवर जातात . प्रत्येकाला विदेशी पर्यटक का सारखे मोकाटपणे जगावे अशी इर्षा निर्माण करणारे गोव्यातील स्वच्छंद किनारे सार्‍यांनाच मोहून टाकतात. निसर्गाचा स्पर्श त्याला आत्मनिर्भर करतो म्हणूनच प्रत्येक पर्यटक म्हणतो मी गोव्याच्या प्रेमात पडलो आहे.

गोवा: कोविडकाळातही केली अर्थक्रांती- मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गोव्याच्या नंदनवनाचे वर्णन एक सुंदर तुकडा असे केले होते. यामध्ये तुकडा या इतर वेळी थोडा गद्य वाटणाऱ्या   शब्दाचे नवे रूप या शब्दप्रयोगात सापडते.  बालगंधर्वांच्या आलापीवर तिरखवाने  तबल्याचा तुकडा टाकावा आणि मंत्रमुग्ध करावं तसं हे एक सुंदर तुकडा असं गोव्याचं वर्णन ऐकू आलं पाहिजे. गोवा निश्चितच कसा आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर देणे तर फार कठीण आहे. दोन सरिता, बाजूला डोंगर, उतारावर घरे, मधल्या खोऱ्यात भाताची शेते किंवा पोफळीची कुळागरे आणि वेड लावणाऱ्या वेळा (समुद्र किनारे) म्हणजे गोवा. असा गोवा रस्त्याने कुठेही जाताना दिसतो. बाजार व यात्रा हे गोव्याच्या जीवनाचे एक दुसरे महत्त्वाचे अंग. बाजार म्हटलं की आठवते ती आधी मासळी. मासळी किती चांगली मिळाली यावर आजचा दिवस किती चांगला गेला हे गोव्यात ठरते त्यामुळे सर्वांचीच आधी फेरी या मासळीबाजारात होते दुकाने उघडण्यात च्या आधी दुकानदार बाजारात करतील कोया मासळी बाजारातच चांगली मासळी घरी पाठवून दिली की मग धंद्याला सुरुवात असा गोव्यात शिरस्ता आहे. त्यातही गोवेकर दुपारी विश्रांती घेणारच.

अमेरिकास्थित गोमंतकीय डॉक्टरांची गोव्याला 14 ऑक्सिजनची मदत 

गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारं गोवा हे भारतातलं एकमेव राज्य आहे. ३० मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोवा जैवविविधतेनेही समृद्द आहे.

संबंधित बातम्या