Goa: भटक्या कुत्र्यांचा 8 वर्षीय मुलीवर हल्ला

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांकडून मागणी (Goa)
Goa: भटक्या कुत्र्यांचा 8 वर्षीय मुलीवर हल्ला
Stray dogs in GoaDainik Gomantak

Goa: नावेलीत (Navelim) भटक्या कुत्र्यांनी (Stray dogs) आठ वर्षीय मुलीवर हल्ला (Dogs Attack on Girl in Goa) केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात मुलगी गंभीर स्वरुपात जखमी (Serious Injured) झाली आहे. मुलीवर 8 कुत्र्यांनी धाव घेऊन 20 पेक्षा अधिक चावे घेतले असून तिच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण (Anger among citizens) झाले आहे.

Stray dogs in Goa
Goa: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

नावेलीतील ही मुलगी घराजवळ असलेल्या किराणा दुकानात काल चिप्सट पॅकीट आणण्यास गेली होती. ती जात असताना तिला कुत्र्यांच झुंड दिसल्यावर ती घाबरुन पळायला लागली. पळताना तिचा तोल गेला व रस्त्यावर पडली. रस्त्यावर पडताच कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. हा हल्ला अचानक झाल्याने घटनास्थळी असलेल्या लोकांना तिचा बचाव करण्यास शक्य झाले नाही.

Stray dogs in Goa
Goa: गुरांच्या हल्ल्यात हॉटेलमालक जखमी

मुलीवर हल्ला केलेल्या कुत्र्यांनी 20 पेक्षा अधिक चावे घेतले असून तिच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. नावेली भागात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com