Goa : शाळेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांस 3 वर्ष पूर्ण होणे आवश्यक

Goa Students need to complete 3 years to get admission in the school
Goa Students need to complete 3 years to get admission in the school

पणजी - गोवा सरकारने (Government of Goa) यंदा शिशु वाटिका वर्गात विद्यार्थी, विद्यार्थिनींना देण्यात येणारे प्रवेश हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020  नुसार देण्यात यावेत, अशी सूचना शैक्षणिक संस्था (Educational institution) प्रमुखांना केली आहे. 31 मे किंवा तत्पूर्वी विद्यार्थ्यास (Students) वयाची तीन वर्षे पूर्ण होणे या धोरणानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. ( Students need to complete 3 years to get admission in the school)

राज्य सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिशु वाटिका आणि बाल वर्ग या पातळीवर करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर प्राथमिक नंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा पातळ्यांवर टप्प्याटप्प्याने नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. गोव्यात सध्या ऑनलाईन पद्धतीने शालेय वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. कोविडची तिसरी लाट ही मुलांसाठी हानिकारक ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याने सरकारने थोडे सावधगिरीचे धोरण वर्ग सुरू करण्याबाबत अवलंबलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com