विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे: डॉ. सुब्रमण्यम भट

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करून आपल्या ज्ञानाचा कक्षा रुंदावत आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगत देशाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन तळसाय बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट यांनी केले.

बोरी: विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करून आपल्या ज्ञानाचा कक्षा रुंदावत आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगत देशाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन तळसाय बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट यांनी केले.

महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासक्रम ओळख  कार्यक्रमाच्या उद्‍घाटन समारंभाप्रसंगी डॉ. भट बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुणाल बोरकर, शेखर सावंत श्रीपाद मराठे, सोनिया नाईक, प्रियांका नाईक या होत्या.

डॉ. भट म्हणाले की, कोविड १९ महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा महाविद्यालयात वर्ग सुरू करण्यास मिळत नाहीत. परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पध्दतीने दिले जाणारे शिक्षण घेऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

कुणाल बोरकर यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. डॉ. भट यांच्या हस्ते पारंपारिक समई प्रज्वलित करून या ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा शुभारंभ करण्यात आला. याचा फायदा प्रथम वर्षाचे ५२ विद्यार्थी घेत आहेत शेखर सावंत यांनी स्वागत केले. सोनिया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तर श्रीपाद मराठे यांनी आभार मानले.goa
 

संबंधित बातम्या