रिव्हॉल्युशनरी गोवन्सवर विश्वासघात केल्याचा आरोप..

रिव्हॉल्युशनरी गोवन्ससोबत (RG) सर्व संबंध तोडण्याचा सु-राज पक्षाचा निर्णय..
Revolutionary Goans
Revolutionary GoansDainik Gomantak

गोवा: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू असतानाच, गोवा सु-राज पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्ष आणि चिन्हाच्या नोंदणीबाबत मनोज परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज परब आणि त्यांच्या टीमने सु-राज पक्षाचा विश्वासघात केल्याचे सांगून, रिव्हॉल्युशनरी गोवन्ससोबत (RG) सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.(Goa Su-Raj Party resolves to disconnect all links with Revolutionary Goans)

Revolutionary Goans
18 तारखेला प्रफुल पटेल आणि संजय राऊत गोवा दौऱ्यावर

रिव्होल्युशनरी गोवन्सने भर पावसात गाजवली होती सभा

गोव्यात भर पावसात रिव्होल्युशनरी गोवन्स (Revolutionary Goans) पार्टीने पक्ष नोंदणी घोषणेची सभा गाजवली होती. विशेष म्हणजे आरजीचे (RG) सर्व नेते यावेळी भावूक झाले होते. हजारो लोक अक्षरशः पावसात डोकीवर खुर्च्या घेऊन आझाद मैदानावरील सभेस उपस्थित होते. त्याशिवाय ते त्याही स्थितीत ‘उजो’च्या घोषणा देत होते.

यावेळी आम्ही गोवा सुराज्य पक्षाद्वारे येती विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून येत्या आठवड्याभरात उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली होती .

Revolutionary Goans
Goa Election:..त्यामुळे कळंगुट काँग्रेस समितीच्या सदस्यांचा संयुक्त राजीनामा

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला निवडणूक आयोगान दिली मान्यता

गोवा निवडणूक आयोगाने (Election Commission) गोवा रिव्होल्युशनरी गोवन पक्षाला रजिस्टर करुन अधिकृत असे पक्षाचे फुटबॉल (Football) हे चिन्ह दिले आहे.

गोव्याच्या निवडणूक रिंगणात औपचारिकपणे उडी मारत . आरजीचे संस्थापक मनोज परब यांनी राज्याच्या राजधानीतील आझाद मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली होती.

गोवा सु-राज (Goa SU-Raj Party) पक्षाकडून मिळालेली आश्वासन:

  • सामायिक लेखी परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाईल. त्याची तारीख आगाऊ जाहीर केली जाईल. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, आणि एका परीक्षेतून विविध पदांसाठी निवडप्रक्रिया राबवली जाईल.

  • लेखी परीक्षेत मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याची सामायिक मुलाखत घेतली जाईल. ज्यामुळे ज्या जागांवर भरती करायची आहे तेथील गर्दी टाळता येईल आणि बोलावलेल्या उमेदवानांनाच

  • प्रत्येक मुलाखतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. मुलाखतीनंतर मिळालेले गुण लगेच विद्यार्थ्याला सांगितले जातील.

  • प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार टाळण्यासाठी वेगवेगळे प्रश्वपत्रिका संच बनवले जातील, आणि परीक्षेवेळी कोणताही संच निवडला जाईल. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही केली जाणार.

  • नोकरीमध्ये फक्त गोव्यातील मूळ नागरिकांनाच संधी दिली जाईल, गोव्याबाहेरील लोकांना नोकरीमध्ये संधी नसेल.

  • तसेच गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन केंद्रे उभारणार. कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण हे बंधनकारक करणार.

  • सरकारी नोकरीच्या तयारीसाठी कोचिंग सेंटर स्थापन करणार.

  • गोव्यातील तरुणांना नोकऱ्या सहज उपलब्ध होणार

  • पारदर्शक परीक्षा पद्धत आणणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com