गोव्यातील उपनिरीक्षक सुनील गुडलर खात्‍यांतर्गत चौकशीत दोषी

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

नोटिशीला दिलेल्या उत्तराने उपमहानिरीक्षकाचे समाधान झाले नाही. मात्र त्याला सेवेतून बडतर्फ करण्याऐवजी त्याच्या सहा वेतनश्रेणीत कपात करून सेवेत ठेवण्यात आले.

पणजी: यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्याविरुद्ध पोलिस खात्यांतर्गत केलेल्या चौकशीत दोषी धरण्यात आले होते व त्याला सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये यासंदर्भातची कारणेदाखवा नोटीस पोलिस उपमहनिरीक्षक राजेश कुमार यांनी बजावली होती. दोघा विदेशी नागरिकांना ड्रग्ज देताना सीसी टीव्ही कॅमेरामध्ये तो सापडला होता. त्यामुळे खात्यांतर्गत आरोपपत्र देऊन त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याने नोटिशीला दिलेल्या उत्तराने उपमहानिरीक्षकाचे समाधान झाले नाही. मात्र त्याला सेवेतून बडतर्फ करण्याऐवजी त्याच्या सहा वेतनश्रेणीत कपात करून सेवेत ठेवण्यात आले.

२००६ साली गुडलर पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रूजू झाला होता व चार वर्षात त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक रक्कम सुमारे १६८ टक्के असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. २०१० साली ड्रग्ज माफिया डुडू प्रकरणात उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा नोंद केला होता. पोलिस सेवेतून त्याला निलंबित करण्यात आले होते. सीबीआयने अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत बेहिशेबी मालमत्तेचा मुद्दा समोर आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली होती. ही चौकशी पूर्ण होऊन विशेष न्यायालयात काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले आहे.

संबंधित बातम्या