गोवा: सुभाष वेलिंगकरांनी घेतली संभाजी भिडेंची भेट; महत्त्वाच्या विषयावर केली चर्चा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

गोव्याच्या सांस्कृतिक खच्चीकरणाच्या प्रक्रियेस झपाट्याने चालना कशी मिळत आहे, हे वेलिंगकर यानी भिडे गुरुजींच्या निदर्शनास आणून दिले.

पणजी: डिचोली येथे शिवप्रेमींच्या वतीने आयोजित महासभेसाठी गोवा भेटीवर असलेले थोर शिव-व्रती, "शिवप्रतिष्ठान" चे  संभाजी भिडे यांची सविस्तर भेट भारतमाता की जय संघाचे राज्य संघचालक व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे राज्य-निमंत्रक  सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी काल भेट घेऊन त्यांच्याशी गोव्यातील सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात चाललेल्या घडामोडींबद्दल चर्चा केली. ही भेट भा.भा.सु.मं. डिचोली प्रभागाचे अध्यक्ष श्रीकृष्ण धोंड यांच्या घरी झाली.

गोव्यात सत्ताधारी मंत्र्याकडून छत्रपती शिवरायाचा पुतळा उभारण्यास तसेच पोलिसांकरवी शिवजयंती मिरवणूक रोखणे व बंदी घालणे, शिवरायांच्या पुतळ्याला विशिष्ट जमातीचा विरोध, शिवरायांच्या बेतुल येथील किल्ल्याकडे जाणारी पारंपारिक वाट बंद करण्याचा विशिष्ट जमातीचा विरोध, गोव्यातील सत्ताधार्यांच्या वाढत्या अल्पसंख्यांक तुष्टीकरण धोरणामुळे, अगदी देशाच्या व केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धुडकावून लाऊन प्राथमिक स्तरावर चर्चच्या परकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर ओतले जाणारे कोट्यावधी रुपयांचे सरकारी अनुदान आणि या धोरणाचा दुष्परिणाम म्हणून सुमारे 450 मराठी-कोकणी या मातृभाषा-माध्यमाच्या बंद पडल्याची पोकळी भरून काढण्यासाठी नवीन मराठी-कोकणी शाळांना परवानगी गेल्या 4 वर्षांपासून नाकारणे यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक खच्चीकरणाच्या प्रक्रियेस झपाट्याने चालना कशी मिळत आहे, हे वेलिंगकर यानी भिडे गुरुजींच्या निदर्शनास आणून दिले.(Goa Subhash Welingkar meets Sambhaji Bhide Discussion on important topics)

गोवा: परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विध्यार्थांना घेतले ताब्यात

गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजप सरकारने मातृभाषा खच्चीकरणाची तसेच काझिनोंच्या व्यसनी व जुगारी अड्ड्यांना व  बीभत्सता व ड्रग्ज,वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणार्या किनारपट्टीतील अनिर्बंध रेव्हपार्ट्यांना बढावा देऊन गोव्याची सांस्कृतिक प्रतिमाच कशी नेस्तनाबूत केली आहे, हे सोदाहरण निदर्शनास आणून दिले. मातृभाषा-रक्षणासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने गेली 10 वर्षे चालवलेल्या आंदोलनाची माहितीही भिडेगुरुजींना दिले. भारतमाता की जय संघ, शिवप्रतिष्ठानच्या कार्याला पूर्ण सहकार्य देईल असेही वेलिंगकर यानी भिडेगुरुजींना सांगितले.

हिदूंच्या रामसेनेवर व प्रमोदजी मुतालिकांवर, इथे कोणताही कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न करता देखील, गोव्यात बंदी घालून 2012 पासून, भाजपा सरकारे, ही बंदी दर सहा महिन्यांनी वाढवत आहेत. परंतु देशभर हिंदुविरोधी दंगली, कत्तली, बलात्कार, हिंदु दुकाने व घरेदारे लुटणे व जाळपोळ करणार्या, आतंकवाद्यांशी घनिष्ठ संबंध रंगेहात सापडलेल्या " पाॅपुलर फ्रंट ऑफ इंडिया" या संघटनेवर बंदी सोडाच, या सरकारचे, मतपेटीसाठी, प्रोत्साहन मिळत असल्याचे वेलिंगकरांनी निदर्शनास आणून दिले. 

अधिक गतिविधींसाठी पुन्हा भेटण्याची गरज उभयतांनी व्यक्त केली. ही भेट व संबंध ,गोव्यातील अधःपतन रोखण्याच्या कामी फारच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास  वेलिंगकर यानी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी प्रा. प्रवीण नेसवणकर, सूर्यकांत गावस, प्रा. आत्माराम गावकर हे भारतमाता की जय संघाचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या