Goa: सावळवाडा, पेडणे येथील युवकाची आत्महत्या

कृषी विभागात सहाय्यक कर्मचारी म्हणून कामाला होते. (Goa)
Gauresh Teli,वय 33 वर्षे, Goa
Gauresh Teli,वय 33 वर्षे, GoaDainik Gomantak

मोरजी: कृषी विभागात (Department of Agriculture) ओल्ड गोवा (Old Goa) येथे सहाय्यक कृषी कर्मचारी म्हणून कामाला आसलेले सावळवाडा पेडणे येथील गौरेश मोहन तेली(वय 33 वर्षे), या इसमाने आपल्या घराशेजारी असलेल्या जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा (Suicide by strangulation) प्रकार घडला. सदर माहिती पेडणे पोलिसांना (Pernem Police) बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मिळाल्यानंतर पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक हरिष वायंगणकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा (Postmortem) केला. सदर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बांबोळी (GMC, Bambolim), येथे पाठवून देण्यात आला.

Gauresh Teli,वय 33 वर्षे, Goa
Flood Impact: 86 वर्षांच्या विष्णू पद्माकर सावईकरांच्या डोळ्यात प्रश्‍नांचा महापूर

सायंकाळी त्याच्यावर स्थानिक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गौरेश ओल्डगोवा येथील कृषी विभागात सहाय्यक कर्मचारी म्हणून कामाला होते. आपल्या घराशेजारी असलेल्या रानात त्यांनी आत्महत्या का केली यासंबंधी चर्चा सुरू असून काल सायंकाळी गौरेश हा आपल्या घरात निघून गेल्याची माहिती मिळाली आहे. घरची मंडळी त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी जवळच्या रानात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर दहा वाजता त्याची माहिती पेडणे पोलीस स्थानकाला देण्यात आली. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक हरीश वायंगणकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून दिला. सायंकाळी सदर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com