गोवा: चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

सहा एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणासंबंधी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पणजी : काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा न देता दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर या़च्यासमोर ५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सभापती निवाडा देण्यास वेळ लावत असल्याकारणाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याआधीच धाव घेतली आहे. आता त्यांच्या याचिकेवर सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी आता ५ एप्रिलला सुनावणी घेण्याचे सभापतींनी निश्चित केले आहे.

यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सभापती कडून अंतिम सुनावणीसाठी तोडकर यांची अपात्रता याचिका नोंदवली असल्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात ॲटर्नी जनरल तुषार मेहता यांनी सादर केले होते यामुळे चोडणकर यांची याचिका निकालात न करता सभापतींना सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता मात्र सभापतींनी अंतिम सुनावणी होऊन पंधरा दिवस लोटले तरी अद्याप निवाडा जाहीर केलेला नाही त्यामुळे आता सहा एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणासंबंधी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Goa Supreme Court to hear Chodankars petition)

पणजी स्मार्ट सिटी: श्रीनेत कोठवाळे यांची केलेली बदली सरकारने स्थगित केली

थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, पणजीचे  आमदार अतनासिओ मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा,  सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस,  काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस व केपेचे आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला आहे याप्रकरणी 19 महिन्यांपूर्वीच चोडणकर यांनी सभापतींना समोर अपात्रता याचिका सादर केली आहे हे याचिकेवर सभापती निवड देण्यास विलंब लावत असल्याकारणाने त्वरित निवाडा देण्यास सभापतींना  निर्देश द्यावेत यासाठी चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मणिपूर येथील एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सभापतींनी अशा प्रकरणांत नव्वद दिवसात निवाडा द्यावा असे निर्देश दिले आहेत. या निवड्याचा हवाला देत चोडणकर यांनी ही याचिका सादर केली आहे.

संबंधित बातम्या