गोवा सुरक्षा मंचतर्फे १७ प्लाझ्मा दात्यांचा सन्मान

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

गोवा सुरक्षा मंचच्यावतीने प्लाझ्मा दान करणाऱ्या सतरा जणांचा सन्मान नुकताच वेर्णा वसाहत येथे पार पडला.

मुरगाव:  गोवा सुरक्षा मंचच्यावतीने प्लाझ्मा दान करणाऱ्या सतरा जणांचा सन्मान नुकताच वेर्णा वसाहत येथे पार पडला. गोव्यातील कोविड १९ उपचारानंतर बरे झाल्यानंतर इतर रुग्णांना जीवदान देण्यासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्या, वेर्णा वसाहतीतील टुलीप कंपनीच्या १७ कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांच्या हस्ते हा सन्मान पार पडला. 

यावेळी हर्षद देवारी, संतोष सतरकर, शेखर पालेकर, समीर खुटवाळकर आणि संजय नाईक उपस्थित होते. यावेळी प्लाझ्मा दान केलेल्या प्रितेश नाईक, चेतन वायंगणकर, विलास सामंत, योगेश पिसुर्लेकर, श्रीनिवास तारी नार्वेकर, प्रशांत पवार, विनोद आचारी, अनिल रामनाथकर, सुरज राणे, अनिल शाहू, जेनिफा मिरांडा, रेषमिता पळदेसाई, रुपेश देसाई, संजू नाईक, प्रकाश नाईक, राजाराम सावंत आणि अर्जुन सावंत  यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात नितीन फळदेसाई यांनी यावेळी म्हणाले, या कोरोना महामारीत प्लाझ्मा दान करून आपण मोठे सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. आपल्या प्लाज्मा दानाने अनेकांचे प्राण वाचतील व हा आपला छोटासा प्रयत्न अनेकांना जीवनदान देईल. मी आपले शतशः धन्यवाद मानतो. यावेळी त्यांनी टुलीप कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. कंपनीच्या प्रोत्साहनामुळेच आज हे कर्मचारी प्लाझ्मा दान करण्यास तयार झाले. तसेच अधिकाऱ्यांसह ज्या सर्वांनी प्लाझ्मा दान केला, त्यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढले. गोमंतकीय जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण केलेल्या कामाची तुलना करता येणार नाही, असे फळदेसाई म्हणाले. 

याकामी आतापर्यंत जे कोविडमधून बरे झालेत त्यांनी प्लाझ्मा दान करायला पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही फळदेसाई यांनी यावेळी केले. सरकारनेही या कामी सर्वांना मदत करायला हवी, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या