Goa: स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून राष्ट्रप्रेमी युवक तयार होणे गरजेचे

रवीन्द्र भवन मडगाव येथे स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी, स्वामी विवेकानंदांची शिकवण युवकांर्यंत पोहोचविणे व त्यांच्या प्रेरणेतून देशात राष्ट्रप्रेमी युवक तयार होणे गरजेचे आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन स्वामी विवेकानंदांच्या फोटोला फुले अर्पण केली.
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन स्वामी विवेकानंदांच्या फोटोला फुले अर्पण केली. Dainik Gomantak

फातोर्डा : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचे पुण्यस्मरण करणे हे प्रत्येक भारतवासियांचे कर्तव्य आहे. त्यांची ख्याती साता समुद्रा पार पोहचली आहे. त्यांची शिकवण युवकांर्यंत पोहोचविणे  व त्यांच्या प्रेरणेतून (Inspiration) देशात राष्ट्रप्रेमी युवक (Patriotic youth) तयार होणे गरजेचे असल्याचे रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी दिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले. 

रवीन्द्र भवन मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन त्यांच्या फोटोला फुले अर्पण केली. 

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन स्वामी विवेकानंदांच्या फोटोला फुले अर्पण केली.
Goa: हॉटेले खुली करण्यास मिळणार परवानगी

देशाची उज्वल परंपरा, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर या केंद्रातर्फे युवकांना प्रेरणादायी ठरेल असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असेही दामू नाईक यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रवीन्द्र भवन मडगावच्या सदस्य सचिव संध्या कामत, नगरसेवक कामिल बार्रेटो, अधिकारी पुनम बुधोलकर, रवीन्द्र भवनचे सदस्य सुनील नाईक, अमेय करमली व अन्य उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com