कोविड टाळेबंदीच्या काळात माहिती संकलन करून स्‍वयंपूर्ण गोव्‍याची निर्मिती

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कोविड टाळेबंदीच्या काळात कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारी यंत्रणा वावरत होती. जनतेला मदत करण्यातही ही यंत्रणा व्यस्त होती. त्याचबरोबर स्वयंपूर्ण गोवा बनवण्यासाठी माहिती संकलनाचे काम कोविड टाळेबंदीच्या काळात सरकारी यंत्रणेने मार्गी लावले होते.

पणजी: कोविड टाळेबंदीच्या काळात कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारी यंत्रणा वावरत होती. जनतेला मदत करण्यातही ही यंत्रणा व्यस्त होती. त्याचबरोबर स्वयंपूर्ण गोवा बनवण्यासाठी माहिती संकलनाचे काम कोविड टाळेबंदीच्या काळात सरकारी यंत्रणेने मार्गी लावले होते. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करण्यापूर्वीच राज्य सरकारने स्वयंपर्ण गोव्याची तयारी पूर्ण केली होती.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लीक ॲडमिनिस्ट्रेशन (जीपार्ड) या संस्थेकडे याचे काम सोपवण्यात आले. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांनी गावागावात जाऊन सर्वेक्षण केले. त्यांची पंच व इतरांची मते जाणून घेतली. त्यातून गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी काय काय केले पाहिजे, याचा गाववार आराखडा तयार केला गेला. याच धर्तीवर शहरांचेही सर्वेक्षण करून आराखडे तयार केले आहेत. 

गावातील गरजा गावातच कशा भागवता येईल, या मूळ संकल्पनेवर हे आराखडे तयार केले आहेत. दुग्धोत्पादन, अन्न धान्य उत्पादन, भाजीपाला इथपासून ऊर्जेची गरज भागवण्यासाठी बायोगॅस सयंत्र निर्मिती, सौर ऊर्जा निर्मिती आदींचा समावेश या आराखड्यात केला आहे. २ ऑक्टोबरला या मोहिमेची अधिकृतपणे सुरवात केली जाणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या