गोवा: अटल सेतूवर टॅक्सीला लागली आग
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021
काल मध्यरात्री 12 च्या सुमारास पणजी येथील अटल सेतूवर एका टॅक्सीला आग लागली
generalपणजी : काल मध्यरात्री 12 च्या सुमारास पणजी येथील अटल सेतूवर एका टॅक्सीला आग लागली. पणजी वाहतूक निरिक्षक सोमनाथ म्हाजीक यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावहून म्हापसा येथे जाणाऱ्या या टॅक्सिला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी वेळीच धाव घेऊन आग विझवली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने जळलेली टेक्सी बाजूला काढली. याघटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत: पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह -