Goa Taxi: डिजिटल मीटरमध्ये असणार ‘ॲप’प्रमाणेच सुविधा
Taxis in GoaDainik Gomantak

Goa Taxi: डिजिटल मीटरमध्ये असणार ‘ॲप’प्रमाणेच सुविधा

काहीजणांकडून गोवा टॅक्सीचालकांची दिशाभूल

पणजी: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टॅक्सींना डिजिटल मीटर (Goa Taxi Digital Meters) बसविण्यात येणार आहे. काहींना आता ‘मोबाईल ॲप’ची (Mobile App) सुविधा हवी आहे. या डिजिटल मीटरमध्ये ‘ॲप’प्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्यांनी वेळेत मीटर बसविले नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. टॅक्सी व्यवसायाशी संबंध नसलेले काहीजण टॅक्सीचालकांची दिशाभूल करत असल्याचे मत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

ग्राहकांना मोबाईलवरून टॅक्सीचे बुकिंग तसेच वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांची आगाऊ सूचना टॅक्सीचालकांना देणारी यंत्रणाही या मीटरमध्ये बसवण्याच्या सूचना ‘एनआयसी’ला केल्या आहेत. आणखी काही सुविधा त्यामध्ये उपलब्ध केल्या जातील, असे सांगून गुदिन्हो म्हणाले, खाते दाबोळी विमानतळावरील पिवळ्या व काळ्या टॅक्सी संघटनेशी लवकरच करार करणार असून गोवा माईल्सला दिलेले काऊंटर त्यांच्या ताब्यात देणार आहे.

Taxis in Goa
Goa Taxi: आम्ही तुम्हाला निवडून आणले, म्हणत टॅक्सी व्यावसायिकांची आमदार सोपटे यांच्याकडे चर्चा

एकही मीटर सदोष नाही

काही टॅक्सीचालकांनी सदोष डिजिटल मीटर बसविले जात असल्याचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यावर गुदिन्हो म्हणाले की, यासंदर्भात केलेल्या चौकशीत एकही मीटर सदोष नसल्याचे उघड झाले आहे. काही टॅक्सींसाठी हे मीटर बसविण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्याही सोडविल्या जातील. या मीटरमध्ये विविध सुविधा असल्याने ‘मोबाईल ॲप’ची आवश्‍यकता नाही. या मीटरला असलेली बॅटरी बंद करण्याची सोय आहे. त्यामुळे मीटरची बॅटरी लवकर संपण्याचा प्रश्‍नच येत नाही. या मीटरमध्ये वाहतूक खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांची बैठक घेऊन सुधारणा केली जाईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.

Taxis in Goa
Goa Taxi: विमान तिकिटापेक्षाही टॅक्सी भाडे महाग  

3 रुपये किलोमीटरप्रमाणे वाढ

कोविड महामारीमुळे टॅक्सीचालकांवर डिजिटल मीटरचा बोजा पडू नये म्हणून सरकारने शुल्कामध्ये सवलत दिली आहे. पण त्यांना मीटर विनाशुल्क हवे आहेत. सरकार हे मीटर मोफतच देत आहे. मात्र, शुल्काची ५० टक्के रक्कम अर्ज सादर केल्यावर ताबडतोब तर उर्वरित ५० टक्के रक्कम एक वर्षाने दिली जाणार आहे. वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर लक्षात घेऊन टॅक्सींना सरासरी ३ रुपये किलोमीटरप्रमाणे वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डिजिटल मीटरचे पूर्ण शुल्क माफ करणे शक्य नाही, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.