गोव्यातील टॅक्सी चालकांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच; भेटीच्या मगणीवर ठाम

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

गोवा माईल्स या टॅक्सी ॲप विरोधात वाहतूक संचालक आणि वाहतूक सचिव यांना भेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर टॅक्सी मालकांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे वळवला आहे.

पणजी : गोवा माईल्स या टॅक्सी ॲप विरोधात वाहतूक संचालक आणि वाहतूक सचिव यांना भेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर टॅक्सी मालकांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे वळवला आहे. पणजीच्या आल्तिनो भागात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आता शेकडो टॅक्सी मालक एकवटलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी करत आहेत.

'गोवा माईल्स' विरूद्ध गोव्यातील टॅक्सीचालकांचा वाहतूक संचालनालयाला घेराव

मुख्यमंत्री सध्या मडगाव येथे असून ते थोड्या वेळानंतर पणजीच्या दिशेने निघणार आहेत. यामुळे त्यांना भेटण्यासाठी टॅक्सी मालकांना काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोवा माईल्स या टॅक्सी अ‍ॅप वर बंदी घाला अशी टॅक्सी मालकांची मागणी आहे. सरकारने टॅक्सी मालकांना मीटर बसवा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारा असे बजावले आहे. त्याची पूर्तता मात्र अद्याप झालेली नाही. हा विषय मध्यंतरी न्यायालयातही गेला होता आणि न्यायालयाने ही डिजिटल मीटर बसवावेत असा आदेश दिलेला आहे.

गोवा नगरपालिका प्रभाग आरक्षणावर निडणूक आयोगाने दिलं न्यायालयाला उत्तर

संबंधित बातम्या