Goa : लसीकरण मोहिमेत टॅक्सी ड्रायव्हर्स, मोटारसायकल पायलट, सीफेसर्सना प्रधान्य

Goa : लसीकरण मोहिमेत टॅक्सी ड्रायव्हर्स, मोटारसायकल पायलट, सीफेसर्सना प्रधान्य
Goa Taxi drivers motorcycle pilots seafarers predominate in vaccination drive

पणजी : गोव्यामध्ये (Goa) 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वाटप केलेल्या लसींपैकी (Vaccination) 2 लाख 50 हजार 530 पेक्षा अतिरिक्त डोस आहेत, परंतु या वयोगटातील लोकांचा प्रतिसाद खूपच कमी असल्याचे समोर आले आहे.

लसीकरण मोहिमेत गोवा सरकारने टॅक्सी ड्रायव्हर्स, (Taxi drivers) मोटारसायकल पायलट (Motorcycle Pilots) तसेच सीफेसर्सना (seafarers) कोरोना लसीसाठी आग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचा फायदा गोव्यातील तब्बल 30 हजार रजिस्टर टॅक्सी चालक आणि सीफेसर्सना यांना होणार असून ते जोपर्यंत लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणार नाहीत तोपर्यंत त्यांना जहाजामध्ये प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी गोवा सरकारने सरकारी क्षेत्राचे कर्मचारी, पत्रकार आणि इतर आघाडीच्या कामगारांव्यतिरिक्त गोव्याचे किनारे सांभाळणार्‍या जीवरक्षकांना लसीकरणास पात्र ठरविले होते.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, 18-45 वर्षे वयोगटातील व्यक्ती, अल्पवयीन मुले, स्तनपान करणाऱ्या माता, मोटारसायकल पायलट, रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर्स, सीफेसर्स आणि अपंगांना प्राधान्याने लसी उपलब्ध करुन देण्यात येतील. गोव्यामध्ये 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी 2 लाख 50 हजार 530  पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत. परंतु या वयोगटातील लोकांच्या अल्प प्रतिसादाने राज्यात   टीका उत्सव सुरु करुन देखील दिवसाला केवळ 4 ते 5 हजार लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com